cats meow habits : पाळीव प्राण्यांमध्ये मांजरासोबतचे माणसाचे नाते हजारो वर्षांपासूनचे आहे. मानवाला उपद्रव करणारे उंदीर आणि इतर कीटकांना बंदोबस्त करण्याची नैसर्गिक क्षमताही त्याच्याकडे असल्याने घरातील एक उत्तम सोबत असेही त्याचे वर्णन केले जाते. आता हीच मांजर घरभर म्याँव म्याँव करत फिरतात. भूक लागली की यामध्ये जास्त वाढ होते, असाच सर्वसाधारण समज आहे;पण नवीन संशोधन काही वेगळे सूचित करते. जर घरातील महिलांपेक्षा पुरुषांच्या मागे 'म्याँव...म्याँव' करत पुरुषांच्या मागेच का फिरतात? यावर संशोधन झाले असून, एका नवीन अभ्यासात असे सूचित केले आहे की, मांजर पुरुष दिसले की जास्त वेळा आणि मोठ्याने म्याऊ म्याऊ करतात. जाणून घेऊया या संशोधनाविषयी
'इथोलॉजी' (Ethology) या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात मानव-मांजरींच्या परस्परसंवादांचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला. तुर्कीमधील अंकारा विद्यापीठातील यासेमिन सालगिर्ली डेमिरबास यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी त्यांच्या स्वतःच्या घरात ३१ मांजरी आणि त्यांच्या काळजीवाहकांचे निरीक्षण केले.
संशोधकांनी प्रत्येक मांजरीने छातीवर बसवलेला एक लहान कॅमेरा घातला. मांजरे त्यांच्या मालकांच्या घरी परतल्यानंतरच्या पहिल्या क्षणांचे विश्लेषण करण्यात आले. काळजीवाहकांच्या छातीवर लावलेल्या कॅमेऱ्यांचा वापर करून, घरात प्रवेश केल्यानंतरची पहिली १०० सेकंद रेकॉर्ड करण्यात आली. यामध्ये माजराचे ओरडणे, शारीरिक मुद्रा, अंगाला घासणे आणि चेहऱ्यावरील हावभाव यांचा तपशील नोंदवण्यात आला. या निरीक्षणात, पुरुषांकडे पाहून केलेल्या 'मीयाँव'मध्ये सातत्याने झालेली वाढ झाल्याचे दिसले.
मांजरीचे वय, जाती, लिंग किंवा घराचा आकार काहीही असो, मांजरी नेहमीच महिलांपेक्षा पुरुषांकडे पाहून जास्त म्याऊ, गुरगुरताना दिसले. सरासरी पाहिल्यास, घरी पुरुष आल्यावर मांजरं पहिल्या १०० सेकंदांत ४.३ वेळा 'म्याव' असा आवाज करतात. पण, महिला घरी आल्यावर मात्र त्याच वेळेत मांजरं फक्त १.८ वेळाच 'म्याव' करतात. संशोधकांनी आपल्या रिपोर्टमध्ये नमूद केले आहे की, "पुरुषांपेक्षा महिला मांजरींशी जास्त संवाद साधतात. पुरुष शांत राहतात किंवा कमी बोलतात. म्हणूनच, पुरुषांकडून प्रतिसाद मिळवण्यासाठी मांजरींना 'म्याव' करून जास्त प्रयत्न करावे लागतात."
अभ्यासातून दिसून आले आहे की, नैसर्गिक मांजरींच्या सामाजिक गटांमध्ये प्रौढ मांजरी क्वचितच एकमेकांशी 'मीयाँव' करतात. हे vocalization (आवाजी संवाद) प्रामुख्याने मांजरी आणि मानवांच्या संवादात दिसते. हजारो वर्षांच्या पाळीवपणामुळे मांजरींनी शिकले आहे की मानवांकडून सूक्ष्म देहबोलीपेक्षा आवाजाला अधिक तत्पर प्रतिसाद मिळतो. त्यामुळे, अन्न, स्नेह किंवा आश्वासन यांसारख्या गोष्टी मिळवण्यासाठी तोंडी विनंत्या हे एक कार्यक्षम साधन बनले आहे.
तुम्ही घरी मांजर पाळले असले तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तो पुरुष घरी येतो, तेव्हा तुमची मांजर अचानक अधिक आवाजात बोलते.याचा अर्थ काय? 'मीयाँव' करणे हे आपोआप भूक लागल्याचे किंवा अस्वस्थतेचे लक्षण नसते. तो फक्त एक अभिवादन किंवा त्या व्यक्तीने मांजरीच्या उपस्थितीची दखल घ्यावी यासाठीचा प्रयत्न असू शकतो, असेही संशोधनात स्पष्ट झाले.
संशोधनात असेही दिसून आले की, मांजर आपला माणूस घरी आलेला पाहते, तेव्हा ती एकाच वेळी दोन गोष्टी करते: पहिली खूप उत्साहित होते किंवा तणाव दूर झाल्यासारखे शांत आणि निवांत होते. माणूस घरी आल्यावर तिला उत्साह आणि आराम दोन्ही मिळतो. दरम्यान, हा अभ्यास फक्त तुर्की या देशात आणि थोड्याच मांजरींवर (म्हणजे लहान नमुना घेऊन) करण्यात आला आहे. त्यामुळे, जगभरातील मांजरं देखील अशाच प्रकारे वागतात की नाही, हे निश्चितपणे सांगता येत नाही. यासाठी, संशोधकांचे म्हणणे आहे की, वेगवेगळ्या देशांमध्ये आणि संस्कृतींमध्ये असाच अभ्यास पुन्हा करणे गरजेचे आहे.