Pets Animals | 'हे' 10 प्राणी कधीही पाळीव प्राणी म्हणून घरात ठेवू नका

अविनाश सुतार

पोपट (Parrots)

पोपट नैराश्यग्रस्त किंवा आक्रमक होऊ शकतात, आणि स्वतःचे पिसे उपटतात त्यामुळे ते फक्त अनुभवी पक्षीप्रेमींनीच पाळावेत

कोल्हे (Foxes)

पाळीव कोल्हे खूपच दुर्मिळ आहेत. बहुतेक कोल्ह्यांमध्ये वन्य प्रवृत्ती असते, त्यामुळे ते बर्‍याचदा विध्वंसक असतात

साप (Snakes)

काही लोक लहान, विषहीन साप पाळतात, पण मोठे अजगर किंवा साप खूप धोकादायक असतात

माकडे (Monkeys)

माकडे स्वभावतः वन्य प्राणी असल्यामुळे वयानुसार आक्रमक, विध्वंसक आणि चंचल असतात

काटेसुळ (Hedgehogs)

काटेसुळ लाजाळू आणि एकटे राहणारे असतात. काही देशांमध्ये त्यांना पाळणे बेकायदेशीर आहे. ते सॅल्मोनेला सारखे रोग पसरवू शकतात

प्रेरी डॉग्स (Prairie Dogs)

प्रेरी डॉग्स एकटे राहिल्यास उदास किंवा आक्रमक होतात. ते सतत खोदकाम करतात, ज्यामुळे घराचे नुकसान होऊ शकते. रोगांचा प्रसार होऊ शकतो

रॅकून (Raccoons)

रॅकून हुशार आणि खूप विध्वंसक असतात. त्यांचे हात इतके सक्षम असतात की ते कपाटे, दरवाजे, अगदी फ्रिजही उघडू शकतात

स्लो लोरिस (Slow Loris)

स्लो लोरिसच्या चावण्यात विष असते, त्यामुळे माणसाला प्राणघातक अॅलर्जी होऊ शकते

शुगर ग्लायडर (Sugar Gliders)

हे छोटे उडणारे प्राणी रात्री सक्रिय असतात, अस्ताव्यस्त राहतात चुकीच्या काळजीमुळे ते बहुधा आजारी पडतात

स्लॉथ (आळशी प्राणी) Sloths

हे सर्वात शांत प्राणी वाटतात, पण पाळीव प्राणी म्हणून ते योग्य नाहीत. त्यांना उष्ण व दमट वातावरण आणि खास आहाराची गरज असते

येथे क्लिक करा