World's Tallest Cat : जगातील सर्वात उंच मांजर ‘सवाना’ ! जाणून घ्‍या रंजक तथ्य!

पुढारी वृत्तसेवा

सवाना मांजर ही जगातील सर्वात उंच मांजर प्रजाती म्हणून ओळखली जाते.

सवाना ही पाळीव मांजर प्रजाती एका वन्य आफ्रिकन 'सर्वाल' या जातीच्या मांजराचा संकर आहे.

या प्रजातीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची विलक्षण उंची.

उंचीमुळेच सवाना  मांजर प्रजातीने  जागतिक स्तरावर विक्रमाची नोंद केली आहे.

सवाना मांजर त्यांची निष्ठा आणि वन्य प्राण्यांसारखे दिसणारे रूप यांसाठीही प्रसिद्ध आहे.

या अनोख्या मांजराच्या प्रजातीची निर्मिती १९८० च्या दशकात करण्यात आली.

आफ्रिकन 'सर्वाल' जातीच्या मांजराचा पाळीव मांजरासोबत संकर घडवून सवाना ही प्रजात अस्तित्वात आणली गेली.

सवाना मांजर मालकांशी घट्ट नाते जोडते. 

वन्य 'सर्वाल' वंशाच्या संकरामुळे ही मांजरे उत्कृष्ट उड्या मारणारी आणि चढाई करणारी असतात.

येथे क्लिक करा.