Warren Buffett $6 billion donation  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Warren Buffett $6 billion donation | वॉरेन बफे यांनी दान केले तब्बल 6 अब्ज डॉलर्सचे शेअर; 'या' 5 संस्थांना घसघशीत देणगी

Warren Buffett $6 billion donation | आत्तापर्यंत दान केलेली रक्कम 60 अब्ज डॉलर्सच्या पार; 94 वर्षीय बफे 152 अब्ज डॉलर्स संपत्तीचे मालक आहेत बफे

पुढारी वृत्तसेवा

Warren Buffett $6 billion donation Warren Buffett family foundations Gates foundation charity philanthropy Berkshire Hathaway shares

ओमाहा (नेब्रास्का) : जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि परोपकारी उद्योगपती वॉरेन बफे यांनी तब्बल 6 अब्ज डॉलर्स किमतीचे Berkshire Hathaway चे शेअर्स गेट्स फाऊंडेशनसह त्यांच्या कुटुंबीयांच्या चार संस्थांना दान दिले आहेत.

बफे यांचे हे वार्षिक दान आजपर्यंतचे सर्वात मोठे असून, त्यांनी 2006 पासून सुरू केलेल्या परोपकारी कार्यातील एकूण देणगीची रक्कम आता 60 अब्ज डॉलर्सच्या पार गेली आहे.

देणगीचे तपशील

बफे यांनी यावर्षी एकूण 12.36 मिलियन Berkshire Hathaway Class B शेअर्स दान केले. त्याचे वितरण पुढील प्रमाणे करण्यात आले आहे.

  1. गेट्स फाऊंडेशन: 9.43 मिलियन शेअर्स

  2. Susan Thompson Buffett Foundation (पत्नीच्या नावाने): 9,43,384 शेअर्स

  3. Howard G. Buffett Foundation: 6,60,366 शेअर्स

  4. Sherwood Foundation (सुसी बफे यांच्या नेतृत्वाखाली): 6,60,366 शेअर्स

  5. NoVo Foundation (पीटर बफे यांच्या नेतृत्वाखाली): 6,60,366 शेअर्स

बफे यांची संपत्ती

या दानानंतरही वॉरेन बफे यांच्याकडे Berkshire Hathaway कंपनीतील 13.8 टक्के शेअर्स शिल्लक आहेत. देणगीपूर्वी त्यांची एकूण संपत्ती 152 अब्ज डॉलर्स इतकी होती. दानानंतर ते जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरतात.

वयाच्या 94 व्या वर्षीही बफे यांनी स्पष्ट केले आहे की, ते भविष्यातही आपले शेअर्स विकण्याचा कोणताही विचार करत नाहीत.

वारसा आणि इच्छापत्र

गेल्या वर्षी वॉरेन बफे यांनी आपले इच्छापत्र बदलून, त्यांच्या निधनानंतर उरलेली 99.5 टक्के संपत्ती एका ट्रस्टला द्यावी, असा निर्णय घेतला आहे. हा ट्रस्ट त्यांचे तिन्ही मुले — हॉवर्ड (70), सुसी (71) आणि पीटर (67) — यांच्या देखरेखीखाली राहिल.

त्या निधीचा उपयोग पुढील 10 वर्षांत कोणत्या सामाजिक कारणांसाठी करायचा याचा निर्णय तिघांनाही एकमताने घ्यावा लागेल.

संबंधित संस्थांचे कार्य

Susan Thompson Buffett Foundation: प्रजनन आरोग्य व शिक्षणावर भर

Sherwood Foundation: नेब्रास्कातील स्थानिक संस्था व बालशिक्षण

Howard G. Buffett Foundation: जागतिक भूक, मानवी तस्करीविरोधी कार्य आणि संघर्ष निवारण

NoVo Foundation: महिलांचे सक्षमीकरण व आदिवासी समाजासाठी विशेष उपक्रम

मृत्यूनंतर गेट्स फाऊंडेशनचे दान थांबणार...

वॉरेन बफे यांनी स्पष्ट केले आहे की, गेट्स फाऊंडेशनला मिळणारी देणगी त्यांच्या मृत्यूनंतर थांबेल, मात्र त्यांनी उर्वरित संपत्ती आपल्या मुलांच्या सामाजिक दायित्वासाठी राखून ठेवली आहे.

वॉरेन बफे यांचे हे दान केवळ आर्थिकदृष्ट्या मोठे नसून, सामाजिक बदलासाठी त्यांच्या असलेल्या कटिबद्धतेचा आणि जबाबदारीचा आदर्श आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT