Putin praise Narendra Modi pudhari
आंतरराष्ट्रीय

Putin praise Narendra Modi: नरेंद्र मोदींच्या 'आयडिया'मुळं युक्रेन रशिया युद्ध संपू शकतं.... पुतीन यांचे मोठे वक्तव्य

नरेंद्र मोदी हे जगातील त्या नेत्यांमध्ये सामील आहेत ज्यांचे रशियासोबतचे चांगला आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र असं असलं तरी ते युक्रेन युद्ध संपवण्याचा मुद्दा कायम उचलून धरतात.

Anirudha Sankpal

Putin praise Narendra Modi Russia Ukraine war: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध संपवण्याच्या दृष्टीकोणातून एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवलेल्या कल्पनेची स्तुती देखील केली आहे. गुरूवारी पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील त्या नेत्यांमध्ये सामील आहेत ज्यांचे रशियासोबतचे चांगला आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र असं असलं तरी ते युक्रेन युद्ध संपवण्याचा मुद्दा कायम उचलून धरतात.

पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युद्ध संपुष्टात आणण्यामध्ये रस असून त्यांच्या जवळ याबाबतच्या चांगल्या कल्पना देखील आहेत. याद्वारे दोन्ही देशांसाठी एक सर्वमान्य समाधान शोधलं जाऊ शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बाबतीत तटस्थ भूमिका ठेवतात. त्यांना फक्त संघर्ष संपुष्टात आणायचा आहे.

पंतप्रधान मोदींच्या कल्पनेसाठी आभार

रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्ध संपुष्टात आणण्यासाठी दिलेल्या आयडियाबद्दल त्यांचे आभारी आहोत. पुतिन यांनी मोदींच्या संघर्षाला चर्चा आणि शांतीपूर्ण पद्धतीनं लवकरात लवकर संपवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या इच्छेसाठी देखील आभार मानले आहेत.

माणुसकीचा पवित्रा

पंतप्रधान मोदी सतत रशिया - युक्रेन युद्धावर चर्चा आणि राजनैतिक मार्गाने उपाय शोधण्यावर भर देतात. ऑगस्टमध्ये जपानी वर्तमानपत्र 'द योमिउरी शिंबुन' ला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी भारताने या संघर्षाबाबत तत्वावर आधारित आणि माणुसकीचा पवित्रा कायम ठेवला आहे.

दोघांचे चांगले संबंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे रशिया आणि युक्रेन या दोघांसोबत चांगले संबंध असल्याचा नेहमी हवाला देतात. त्यामुळं या दोन्ही देशांमध्ये शांतता नांदावी यासाठी सार्थक प्रयत्न करण्याबाबत मदत करू शकतो. भारत युक्रेनमध्ये लवकरात लवकर आणि कायमस्वरूपी शांतता निर्माण करण्याच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांचे समर्थन करण्यात तयार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांची सप्टेंबरमध्ये नवी दिल्लीमध्ये भेट झाली होती. पुतिन १८ व्या ब्रिक्स संमेलनासाठी भारतात आले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यापाराबाबचे आपले संबंध दृढ करण्यासाठी तसेच आर्थिक सहयोग २०३० कार्यक्रम ज्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर, उर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि संस्कृती या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर देखील चर्चा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT