Russia NATO War : ‘नाटो’वर रशियाकडून हल्ल्याची शक्यता, युरोपीय गुप्तचर यंत्रणांचा इशारा

युरोप पुन्हा युद्धाच्या उंबरठ्यावर? गुप्तचर अहवालानंतर पॅरिसमध्ये मॅक्रॉन यांची तातडीची बैठक!
Russia NATO War : ‘नाटो’वर रशियाकडून हल्ल्याची शक्यता, युरोपीय गुप्तचर यंत्रणांचा इशारा
Published on
Updated on
  • रशियाकडून आगामी काळात ‘नाटो’ भूभागावर ड्रोन किंवा क्षेपणास्त्रांद्वारे मर्यादित हल्ल्याची भीती.

  • पोलंड, फ्रान्स आणि चेक प्रजासत्ताककडून मॉस्कोच्या वाढत्या धोक्याची गंभीर दखल.

  • बाल्टिक देशांचे नागरिकांना शांततेचे आवाहन; केवळ भीती पसरवण्याचा रशियाचा डाव असल्याचा संशय.

  • ‘क्रेमलिन’ने सर्व आरोप फेटाळले; मात्र युरोपात २०२२ च्या युक्रेन युद्धासारखीच धास्ती कायम.

लंडन : युरोपीय गुप्तचर अधिकाऱ्यांनी रशियाकडून ‘नाटो’ संघटनेच्या लष्करी ताकदीची आणि एकजुटीची परीक्षा पाहिली जाण्याची शक्यता वर्तवली आहे. हा संभाव्य हल्ला अवघ्या काही महिन्यांत होऊ शकतो, असा गंभीर इशारा गुप्तचरप्रमुखांनी दिला आहे.

पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की, गुप्तचर अहवालानुसार रशिया आगामी महिन्यांत ‘नाटो’च्या भूभागावर ड्रोन किंवा क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करू शकतो. ‘नाटो’चा ‘कलम ५’ (सामूहिक सुरक्षा करार) हा व्यवहारात नसून केवळ कागदावरच आहे, हे सिद्ध करणे हा यामागील मुख्य हेतू असू शकतो. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी टस्क यांचा इशारा अत्यंत गंभीर मानत पॅरिसमध्ये राजकीय नेते आणि आगामी राष्ट्राध्यक्ष उमेदवारांची तातडीची बैठक बोलावली.

Russia NATO War : ‘नाटो’वर रशियाकडून हल्ल्याची शक्यता, युरोपीय गुप्तचर यंत्रणांचा इशारा
US-Iran Tension | युद्धाचा वणवा पुन्हा पेटणार? शांतता कराराच्या चर्चेत अडथळा

मर्यादित घुसखोरी आणि कारवायांचे संकेत

चेक प्रजासत्ताकच्या बीआयएस सुरक्षा सेवेचे प्रमुख मिचल कौडेल्का यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नाटो’च्‍या सीमेलगतच्या प्रदेशात मर्यादित स्वरूपाची घुसखोरी, बनावट कारवाया (फॉल्स-फ्लॅग प्रोव्होकेशन्स) किंवा सायबर-प्रचार मोहीम हा रशियन रणनीतीचा भाग असू शकतो. ही परिस्थिती काही वर्षांत नाही, तर अवघ्या काही महिन्यांत उद्‌भवूू शकते, असा इशारा त्यांनी दिला. मात्र, अशा प्रकारचा धोका टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बाल्टिक देशांची सावध भूमिका

दुसऱ्या बाजूला, रशियाच्या सीमेला लागून असलेल्या लाटव्हिया, एस्टोनिया आणि लिथुआनिया या बाल्टिक देशांनी यावर अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. लाटव्हियाच्या सुरक्षा सेवेचे महासंचालक नॉर्मुंडस्‌ मेझविएटस्‌ यांनी स्पष्ट केले की, सध्या तत्काळ हल्ल्याचे कोणतेही ठोस संकेत मिळालेले नाहीत. रशियाचे लष्कर युक्रेनमध्ये अडकलेले असून पाश्चात्त्य समाजात भीती आणि गोंधळ पसरवण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. एस्टोनियाच्या परराष्ट्र मंत्रालयानेही नागरिकांना सोशल मीडियावरील भीतीपासून दूर राहण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Russia NATO War : ‘नाटो’वर रशियाकडून हल्ल्याची शक्यता, युरोपीय गुप्तचर यंत्रणांचा इशारा
Italy Burqa-Niqab Ban : इटलीतील शाळांमध्ये बुरखा आणि नकाबवर बंदीचा प्रस्ताव; पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची मोठी घोषणा

‘क्रेमलिन’कडून आरोप फेटाळले; मात्र युरोपमध्ये अस्वस्थता कायम

‘क्रेमलिन’चे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी या सर्व दाव्यांचे खंडन केले असून रशियाच्या अशा कोणत्याही योजना नसून हे दावे वास्तवाशी सुसंगत नसल्याचे म्हटले आहे. तरीही, २०२२ मध्ये युक्रेनवर प्रत्यक्ष लष्करी आक्रमण करण्यापूर्वीही रशियाने अशाच प्रकारे नकार दिला होता, याची आठवण युरोपीय देशांना आहे. युक्रेन युद्ध पाचव्या वर्षाकडे झुकत असताना दोन्ही बाजूंकडून हवाई हल्ले तीव्र झाले असून ‘नाटो’ आणि रशियामधील वाढत्या तणावामुळे जागतिक चिंता अधिक गडद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news