अमेरिकेतील बहुचर्चित प्रमुख कर आणि खर्च विधेयक असलेल्या 'वन बिग ब्युटिफुल बिल'वर राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी शुक्रवारी (दि. ४ जुलै) स्वाक्षरी केली.  (Image source- X)
आंतरराष्ट्रीय

US President Trump : अमेरिकेतील बहुचर्चित 'वन बिग ब्युटिफुल बिल'चे कायद्यात रूपांतर

विधेयक २१८ विरुद्ध २१४ मतांनी मंजूर, स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर अमेरिकेच्‍या नागरिकांना मोठी भेट

पुढारी वृत्तसेवा

अमेरिकेतील बहुचर्चित प्रमुख कर आणि खर्च विधेयक असलेल्या 'वन बिग ब्युटिफुल बिल'वर राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प (US President Donald Trump) यांनी शुक्रवारी (दि. ४ जुलै) स्वाक्षरी केली. हे विधेयक अमेरिकेच्या संसदेत २१८ विरुद्ध २१४ मतांनी मंजूर झाले होते. २१८ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने, तर २१४ खासदारांनी विरोधात मतदान केले. आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर यापेक्षा मोठी भेट असूच शकत नाही: ट्रम्‍प

शुक्रवारी अमेरिकेच्या सिनेट आणि प्रतिनिधीगृहात 'वन बिग ब्युटिफुल बिल ॲक्ट' मंजूर झाल्यानंतर आपल्या भाषणात ट्रम्प म्हणाले, "अमेरिकेसाठी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर 'वन बिग ब्युटिफुल बिल' पेक्षा मोठी भेट असूच शकत नाही. या विधेयकामुळे, मी २०२४ मध्ये आयोवाच्या जनतेला दिलेले प्रत्येक मोठे आश्वासन पूर्ण झाले आहे. मी वचन दिल्याप्रमाणे, आम्ही 'ट्रम्प टॅक्स कट्स' कायमस्वरूपी लागू करत आहोत. आता टिप्स, ओव्हरटाईम किंवा सामाजिक सुरक्षेवर (सोशल सिक्युरिटी) कोणताही कर लागणार नाही."

अमेरिकेची जनता पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध होईल

ट्रम्प यांनी 'ट्रुथ' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, "अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील रिपब्लिकन सदस्यांनी नुकताच 'वन बिग ब्युटिफुल बिल ॲक्ट' मंजूर केला आहे. आपला पक्ष पूर्वीपेक्षा अधिक एकजूट आहे. अमेरिकेची जनता पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध, सुरक्षित आणि स्वाभिमानी होईल. हाऊस स्पीकर माईक जॉन्सन, सिनेटमधील बहुमताचे नेते जॉन थ्यून आणि त्या सर्व महान रिपब्लिकन खासदारांचे आभार, ज्यांनी आम्हाला आमची वचने पूर्ण करण्यास मदत केली. एकजुटीने आपण ते सर्व काही करू शकतो, ज्याची कल्पना एक वर्षापूर्वीपर्यंत करणेही शक्य नव्हते. आपण काम करत राहू आणि जिंकत राहू. अभिनंदन, अमेरिका!"

नव्‍या कायद्यामुळे नेमकं काय होणार?

'वन बिग ब्युटिफुल बिल' हे विधेयक मंजूर झाल्‍याने आता अमेरिकेतील मध्यमवर्गीयांवरील कराचा बोजा कमी होणार आहे. मोठ्या संख्येने स्थलांतरितांना देशाबाहेर काढणे (मास डिपोर्टेशन), लष्कर आणि सीमा सुरक्षेवरील खर्चात वाढ, तसेच पहिल्या कार्यकाळातील कर सवलती कायम ठेवणे यांसारख्या ट्रम्प यांच्या अनेक प्रमुख धोरणांना या कायद्यामुळे बळ मिळाले आहे. या कायद्यात टिप्स आणि ओव्हरटाईमवर कोणताही कर न लावण्याचा प्रस्ताव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT