Trump VS Musk : 'दुकान बंद करून द. आफ्रिकेला परतावे लागेल' : ट्रम्प-मस्‍क यांच्‍यात पुन्‍हा जुंपली

मस्‍क यांनी पुन्‍हा एकदा दिला नवीन पक्ष स्‍थापन करण्‍याचा इशारा
Trump VS Musk
donald trump - elon muskPudhari Photo
Published on
Updated on

Trump VS Musk |अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प ( Donald Trump) आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क (Elon Musk) यांच्‍यातील वाद पुन्‍हा एकदा चव्‍हाट्यावर आला आहे. मस्‍क यांनी ट्रम्‍प यांच्‍या नवीन कर व खर्च विधेयकावर जोरदार टीका केली. याला तत्‍काळ ट्रम्‍प यांनी उत्तर देत, "दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परत जावे लागू शकते," असा इशारा दिला आहे. ( मस्क हे मुळचे दक्षिण आफ्रिका देशाचे आहेत.)

मस्‍क यांची पुन्‍हा नव्या कर व खर्च विधेयकावर बाेचरी टीका

ट्रम्प यांच्या नव्या कर व खर्च विधेयकाचे वर्णन मस्‍क यांनी 'बिग ब्युटीफुल बिल; असं केलं आहे. हे विधेयक मंजूर झालं तर दुसऱ्याच दिवशी मी अमेरिका पार्टीची स्थापना करेन, असा इशाराच त्‍यांनी ट्रम्‍प यांना दिला आहे. दरम्‍यान, मस्क यांनी अलीकडेच 'एक्स'वर एक पोल (मतदान) घेतले होते. त्यांनी अमेरिकन जनतेला नव्या राजकीय पक्षाबाबत त्यांचं मत विचारलं होतं. यावर मोठ्या संख्येने लोकांनी मस्क यांना पाठिंबा दर्शविल्‍याचे दिसले. मस्क यांनी पक्षासाठी ‘अमेरिका पार्टी’ या नावाची घोषणा देखील केली होती. आपल्या देशाकडे डेमोक्रॅट्स व रिपब्लिकन पार्टीशिवाय इतरही पर्याय असले पाहिजेत, जेणेकरून जनता योग्य नेत्याची, पक्षाची निवड करू शकेल, असेही मस्‍क यांनी म्‍हटले होते.

Trump VS Musk
Trump vs Musk : तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना..! ट्रम्‍प- मस्‍क संघर्षात सर्वात मोठा ट्विस्ट, जाणून घ्‍या नेमकं काय घडलं?

कर विधेयकामुळे अमेरिकेतील लाखो नोकऱ्या जातील 

मस्क यांनी म्‍हटलं आहे की, “ट्रम्‍प सरकारचे नवीन कर विधेयकामुळे अमेरिकेतील लाखो नोकऱ्या जातील. देशाचं मोठं आर्थिक व धोरणात्मक नुकसान होईल. हे विधेयक पूर्णपणे वेडेपणाचं आणि विध्वंसक आहे. माफ करा; परंतु मी आता हे सहन करू शकत नाही. अमेरिकेच्‍या संसदेमध्‍ये अशा हास्यास्पद, घृणास्पद आणि महागडं विधेयकच्‍या बाजूने मतदान करणार्‍यांना लाज वाटली पाहिजे. कारण त्यांना माहिती आहे की त्यांनी चूक केली आहे.”

Trump VS Musk
Elon Musk : ''माफ करा, हे माझ्‍या सहनशक्तीच्या पलीकडचे...' : ट्रम्प यांच्यावर मस्‍क का भडकले?

'कदाचित दुकान बंद करून, घरी परतावे लागेल' : ट्रम्‍प यांचा पलटवार

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्‍ट करत म्‍हटलं आहे की, टेस्लाचे सीईओंनी खर्च कमी करणाऱ्या विभागाचे नेतृत्व करतात. त्यांनी सरकारी अनुदानांवर आणि करारांवर एक नजर टाकावी. मस्‍क यांना जास्त अनुदान मिळू शकते. अनुदानाशिवाय मस्‍क यांना कदाचित दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परत जावे लागेल. यापुढे रॉकेट प्रक्षेपण, उपग्रह किंवा इलेक्ट्रिक कार उत्पादन नाही. आपला देश खूप पैसे वाचवू शकेल. कदाचित आपल्याला खूप पैसे वाचवायचे आहेत!" असेही ट्रम्‍प यांनी म्‍हटले आहे.

मस्‍क यांना नेमके काय खटकले?

अमेरिकेतील नवीन कर आणि खर्च विधेयकामुळे इलेक्ट्रिक वाहनांसाठी साडेसात हजार डॉलरचा लोकप्रिय ग्राहक कर क्रेडिट संपणार आहे. यामुळे इलेक्‍ट्रिक वाहन अधिक महाग होतील. याचा थेट फटका मस्‍क यांच्‍या कंपनीला बसणार आहे. ट्रम्‍प यांनी यापूर्वीही इलेक्ट्रिक वाहन (EV) आदेशाला विरोध केला होता. त्यांनी बायडेन सरकारच्‍या आदेशाला हास्यास्पद म्हटले होते. मस्‍क यांनी राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीत मला पाठिंबा दिला. यावेळी त्‍यांना माहित होते की, माझा इलेक्‍ट्रिक वाहनांना विरोध आहे, असेही ट्रम्‍प यांनी म्‍हटले होते.

Trump VS Musk
Elon Musk : ''माफ करा, हे माझ्‍या सहनशक्तीच्या पलीकडचे...' : ट्रम्प यांच्यावर मस्‍क का भडकले?

उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्‍हान्‍स यांचाही मस्‍क यांना अप्रत्‍यक्ष टाेला

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्‍हान्‍स यांनीही मस्क यांना अप्रत्‍यक्ष टोला लगावला आहे. देशात बेकायदेशीर स्थलांतरितांचा पूर आणणे हे इतर कोणत्याही धोरणापेक्षा देशाला अधिक दिवाळखोरीत टाकेल. देशाला इतर कोणत्याही धोरणापेक्षा जास्त दिवाळखोर करणारी गोष्ट म्हणजे देशात बेकायदेशीर स्थलांतरितांचा पूर आणणे आणि स्थलांतरितांना उदार लाभ देणे. 'वन बिग ब्युटिफुल बिल' ही समस्या सोडवते म्हणूनच नवीन कर विधेयक मंजूर झालेच पाहिजे," असे वान्स यांनी ट्विट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news