Iran US Israel War pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran US Israel War: इराण युद्धात अमेरिकेनं तब्बल १६ लढाऊ एअरक्राफ्ट गमावली... शेखी मिरवणारे ट्रम्प माघार घेणार?

Anirudha Sankpal

Iran US Israel War: अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यात गेल्या तीन आठवड्यापासून युद्ध सुरू आहे. या युद्धात अनपेक्षितरित्या अमेरिकेला इरणाच्या कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे. अनेक फ्रंटवर इराण अमेरिकेला भारी पडताना दिसत आहे. त्यातच अमेरिकेच्या वायू दलाचे मोठे नुकसान झाल्यची बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे जवळपास १६ मिलिट्री एअरक्राफ्ट गमावले आहेत. यात १२ ड्रोन ४ विमानांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे अत्याधुनिक असे मानले जाणारे F-35 फायटर जेटचा देखील समावेश आहे. या विमानाचे देखील नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानी लष्कराचे अमेरिकी बनावटीचे एफ १६ हे विमान पाडले होते. मात्र अमेरिका सरकारने हे वृत्त नाकारलं होतं. आता इराण युद्धात अमेरिकेचे अत्याधुनिक विमान पडल्याची बातमी समोर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अमेरिकेचे किती नुकसान?

अमेरिकेच्या वायू दलाला सर्वाधिक फटका हा ड्रोनच्या बाबतीत बसला आहे. अमेरिकेचे जवळपास १२ MQ-9 Reaper ड्रोन पाडण्यात आले आहेत. हे ड्रोन इराण आणि पश्चिम आशियातील इतर शत्रू राष्ट्रांमध्ये सातत्यानं वापरली जात आहेत. रीपर ड्रोनमध्ये हेलफायर मिसाईल लावलेली असतात. हे ड्रोन २७ तास सलग उडू शकतं.

इराणच्या एअर डिफेन्स सिस्टम आणि मिसाईल्सनी १२ ड्रोन्स पाडले आहेत. यातील एका रीपर ड्रोनची किंमत ही जवळपास २५० कोटी रूपये इतकी आहे. हे ड्रोन्स इराणच्या मिसाईल साईट आणि IRGC च्या तळांवर हल्ले करण्यासाठी पाठवण्यात आले होते.

दुसरीकडं कुवैतने अमेरिकेचे तीन f-15 ही लढाऊ विमानं चुकून पाडली होती. हे तीनही विमाने इराण मिशनवर होती. कुवैतने शत्रू राष्ट्राचे विमान समजून ती पाडली. F-15 हे अमेरिकेचे जुने मात्र अत्यंत शक्तीशाली फायटर जेट्स आहे. त्यात एअर टू एअर मिसाईल लावण्यात आली आहेत. या हल्ल्यात तीनही पायलट्सचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेचे चौथे विमान KC-135 Stratotanker हे इंधन वाहू विमान होते. ते दुसऱ्या विमानात इंधन भरतेवेळी दुर्घटनाग्रस्त झालं होतं. त्यातील ६ क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता.

ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ?

डोनाल्ड ट्रम्प हे इराणवरील एअर स्ट्राईक हा ऑपरेशन सिंदूर सारखा असेल. इराण काही दिवसातच गुडघ्यावर येईल अमेरिकेला कोणतेही नुकसान होणार नाही असं म्हणत होते. अमेरिकेची लष्करी ताकद इतकी मजबूत आहे की इराण काही करू शकणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प म्हणत होते.

मात्र आता एफ १५, रीपर ड्रोन आणि इंधन वाहून नेणारं विमान अशी १६ लष्करी एअर क्राफ्ट्स गमावल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आता उलटा पडत असल्याचं दिस आहे. त्यातच अमेरिकेचे जवान देखील शहीद होत आहेत. इराणमध्ये त्वरित विजय होणार असं सांगणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे प्लॅनिंग चुकल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

काय करणार डोनाल्ड ट्रम्प?

इराण युद्धाबाबत अमेरिकेत सध्याच्या घडीला दोन मतप्रवाह आहेत. काहींच्या मते आता डोनाल्ड ट्रम्प हे अजून जोरदार हल्ले करतील. ते एफ - ३५ आणि बी २ बॉम्बर सारखी अत्याधुनिक शस्त्रे इराणकडे रवाना करतील. मात्र दुसरे जाणकार सांगतात की एवढं मोठं नुकसान पाहून डोनाल्ड ट्रम्प मागे हटण्याची शक्यता आहे. युएनच्या माध्यमातून ते चर्चा सुरू करतील.

दरम्यान, याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सध्या तरी कोणते वक्तव्य आलेलं नाही. व्हाईस हाऊस हे ऑपरेशन सुरूच राहणार असल्याचं सांगत आहे. अमेरिकेकडून इराणवरील हल्ले अजून तीव्र केले तर इराण देखील जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

अमेरिकेला १६ विमाने पडल्यामुळं जवळपास ४००० कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. ड्रोन सहज तयार होतील. मात्र एफ १५ आणि केसी १३५ ही लढाऊ विमाने आणि त्याचे पायलट्स त्यांचे ट्रेनिंग यांना अनेक वर्षे लागतात. जर युद्ध अजून काही दिवस लांबलं तर अमेरिकेला अजून विमाने आणि सैनिक गमवावी लागू शकतात. आता डोनाल्ड ट्रम्प याबाबत कोणता निर्णय घेणार हे पाहणं गरजेच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT