Brenay Kennard Scandal: अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील एका ज्यूरीने लोकप्रिय टिकटॉक इन्फ्लुएंसर ब्रेने केनार्ड हिला तिच्या मॅनेजरच्या पूर्व पत्नीला तब्बल 1.75 दशलक्ष डॉलर्स (सुमारे ₹14.5 कोटी) भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. मॅनेजर टिम मॉन्टॅग्यू यांच्या पत्नी अकीरा मॉन्टॅग्यू यांनी केनार्डवर त्यांच्या वैवाहिक नात्यात हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप करत दावा दाखल केला होता.
तक्रारीनुसार, केनार्डने अकीराशी मैत्रीचा दिखावा केला आणि त्या मैत्रीमधून मिळालेली वैयक्तिक माहिती वापरून तिच्या पतीशी जवळीक वाढवली.
अकीराने सांगितले की, केनार्ड जाणीवपूर्वक विचित्र कपडे घालत असे, पतीसमोर फ्लर्ट करत असे, टंग-रिंग्स दाखवत उत्तेजक हालचाली करत असे. तिच्या म्हणण्यानुसार, हे सर्व वर्तन टिमला आकर्षित करण्यासाठीच होतं.
अकीराने केनार्डला आपली वैयक्तिक माहिती सांगितली होती. तक्रारीत नमूद केले आहे की केनार्डने ही माहिती विश्वास संपादन करण्यासाठी आणि पुढे संबंध वाढवण्यासाठी वापरली.
जानेवारी 2024 मध्ये त्यांच्या घरातच केनार्ड आणि टिमच्या एकत्रित व्हिडिओमुळे अकीराला या संबंधांची खात्री पटली. तक्रारीनुसार, दोघांनी अनेक वेळा खाजगी व्हिडिओ आणि मेसेज केले आहेत.
खटल्यात अकीराने स्पष्टपणे म्हटले की केनार्डमुळे तिचा नवरा तिच्यापासून भावनिकदृष्ट्या दूर गेला. तो आर्थिक व्यवहार लपवू लागला, केनार्डसोबतच्या भेटी व खर्च गुप्त ठेवू लागला आणि परिणामी त्यांच्यात दूरावा निर्माण झाला आहे.
ज्यूरीनं केनार्डला दोषी ठरवत एकूण 1.75 दशलक्ष डॉलर्सची भरपाई ठोठावली—
• $250,000 (₹22,152,789) – Criminal Conversation (व्यभिचार)
• $1.5 Million (₹133,034,226) – Alienation of Affection (वैवाहिक नात्यात हस्तक्षेप)
अमेरिकेच्या काही राज्यांत अस्तित्वात असलेला ‘Alienation of Affection’ कायदा तिसऱ्या व्यक्तीवरही कारवाई करण्याची परवानगी देतो. हा कायदा अत्यंत दुर्मिळ मानला जातो.
निर्णयानंतर केनार्डने माध्यमांशी बोलताना हा निर्णय “अयोग्य” असल्याची टीका केली.
तिने सांगितलं की, “अकीराने स्वतः आमच्या नात्याला परवानगी दिली होती. तिला माहीत होतं की तिचं लग्न मोडत आहे.” मात्र अकीराने हा दावा पूर्णपणे नाकारला आहे.