Taliban cirsis : 'ही' व्यक्ती अफगाणिस्तानची पंतप्रधान होण्याची शक्यता 
आंतरराष्ट्रीय

Taliban cirsis : ‘ही’ व्यक्ती अफगाणिस्तानची पंतप्रधान होण्याची शक्यता

backup backup

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या दहशतवाद्यांच्या यादीमध्ये असणारा आणि तालिबान्यांचा (Taliban cirsis) प्रमुख नेता मुल्ला हसन अखुंद अफगाणिस्ताना पंतप्रधान होऊ शकतो. अतिरेक्यांच्या समुहातील अनेक गटांमध्ये मतभेद असल्यामुळेच अजूनपर्यंत अशा युद्धग्रस्त देशात सरकार स्थापन करण्यात अडथळे येत आहे.

तीन आठवड्यांपूर्वी तालिबानने (Taliban cirsis) काबूलवर वर्चस्व सिद्ध केलं होतं. मुल्ला बरादरच्या नेतृत्वाखालील तालिबानच्या दोहा इकाई, हक्कानी नेटवर्क, पूर्व अफगाणिस्तान संचलित एक दहशतवादी संघटन आणि तालिबानच्या कंधार गटामध्ये सत्ता स्थापनेवरून मतभेद आहेत. याच कारणावरून अफगाणिस्तानात सरकार स्थापन होत नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार एका नव्या फाॅर्म्युल्यानुसार मुल्ला बरादर आणि मुल्ला उमर यांचा मुलगा अखुंद हे डेप्युटीच्या रुपात काम करण्याची शक्यता आहे. हक्कानी नेटवर्कच्या सिराज हक्कानीला भारताच्या बरोबरीचं गृह मंत्रालय आणि अंतर्गत मंत्रालय तयार करण्यासाठी निवडलं जाईल, अशीही माहिती समोर आली आहे.

हिबतुल्लाह अखुंदजादा हा तालिबानचा सर्वोच्च नेता होण्याची शक्यता आहे. मुल्ला हसन अखुंद तालिबानच्या नेतृत्व परिषद रहबारी शूराचे प्रमुख आहे आणि २०२१ मध्ये अमेरिकेबरोबर युद्ध होण्यापूर्वी तालिबान नियंत्रित अफगाणिस्तानमध्ये एक मंत्र्याच्या रुपात कार्य करणार आहे. काबूलवर नियंत्रण मिळविल्यानंतर तालिबानसोबत चर्चा केल्यानंतर माजी राष्ट्रपती हामीद करजई आणि माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यासारख्या अनेक नेत्यांबद्दल कोणतीच भूमिका सध्यातरी दिसत नाही.

पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT