आंतरराष्ट्रीय

fuel price hike : तेलाच्या किंमती उतरणे अशक्य; सौदी अरेबिया, युएईने अमेरिकेला ठेवले होल्डवर

अमृता चौगुले

रियाध; पुढार ऑनलाईन डेस्क : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमती ( fuel price hike ) गगनाला भिडल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ओपेकमध्ये प्रभावी भूमिका बजावणारे सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि संयुक्त अरब अमिरातीचे शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांना तेलाच्या किमती कमी करण्यासाठी फोन केला, पण त्यांनी फोनच उचलला नाही. या दोन्ही देशांनी अट घातली आहे की प्रथम अमेरिकेने येमेनच्या युद्धात त्यांना पाठिंबा द्यावा, त्यानंतरच ते बायडेन यांच्याशी चर्चा करतील.

गेल्या 14 वर्षांत तेलाच्या किमती 130 डॉलरवर ( fuel price hike ) पोहोचल्या आहेत. सौदी अरेबिया आणि यूएई हे दोन देश मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त तेलाचा पुरवठा करू शकतात. अमेरिकेलाही तेलाच्या चढ्या किमतींचा सामना करावा लागत आहे. या संकटावर बायडेन यांनी मंगळवारी सांगितले की तेलाच्या किमती खाली आणण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही. तो व्लादिमीर पुतिन यांचा दोष आहे.

शेख मोहम्मद यांनीही बायडेन यांच्या फोनची विनंती नाकारली

अमेरिकेत तेलाच्या ( fuel price hike ) किमती आणखी वाढू शकतात, असा इशारा बायडेन यांनी दिला आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, बायडेन यांनी सौदी अरेबियाच्या प्रिन्सशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पण, बायडेन हे सौदी अरेबियाचे प्रिन्स यांच्या 86 वर्षीय वडिलांशी बोलले. दुसरीकडे, यूएईच्या शेख मोहम्मद यांनीही बायडेन यांची फोनची विनंती फेटाळून लावली. ही चर्चा आता नंतरच्या टप्प्यावर होणार असल्याचे युएईने म्हटले आहे.

अमेरिकेला रशियाऐवजी सौदी अरेबियाकडून तेल ( fuel price hike ) घ्यायचे आहे, पण तसे होताना दिसत नाही. बायडेन आता इतर पर्याय शोधत आहेत, परंतु ते सापडत नाहीत. बायडेन यांना आता व्हेनेझुएलाला आपल्या कोर्टात आणायचे आहे. त्यांनी आपला दूतही पाठवला आहे. व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात जास्त तेलाचे साठे आहेत. परंतु, ते पुरवण्यास असमर्थ आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT