ऋषी सुनाक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती ड्रेसवरून ट्रोल झाल्या Rishi Sunak Instagram
आंतरराष्ट्रीय

ऋषी सुनाकांच्या निरोपात पत्नी अक्षताचा ४२ हजारांचा ड्रेस, नेटिझन्सनी केले ट्रोल

ऋषी सुनाक यांच्या पत्नी अक्षता मूर्ति ड्रेसवरून ट्रोल!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनच्या संसदीय निवडणुकीत विरोधी लेबर पक्षाने मोठा विजय मिळवला. ६५० जागा असलेल्या ब्रिटनच्या संसदेत लेबर पक्षाने ३७० हून अधिक जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे. ऋषी सुनाक यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. आपल्या शेवटच्या भाषणावेळी सुनाक यांनी आपल्या पराभवाचा स्वीकार केला. यावेळी त्यांच्या पत्नी अक्षता मूर्तिही उपस्थित होत्या. पण, ड्रेसवरून अक्षता मूर्ति ट्रोल झाल्या.

पक्षाच्या पराभवानंतर सुनाकने डाऊनिंग स्ट्रीटवर आपल्या कार्यालयाच्या बाहेर उभे राहून शेवटचे भाषण केले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी अक्षता मूर्ति उभ्या होत्या. सोशल मीडिया युजर्सनी दावा केला की, त्यांनी किंमती ड्रेस घातला आहे, ज्यामुळे त्या खूप ट्रोल झाल्या.

अक्षता मूर्तिने ब्ल्यू, व्हाईट आणि रेड लाईनिंग पॅटर्न ड्रेस घातला होता. सोशल मीडियावर देखील याची खूप चर्चा झाली. एका युजरने ड्रेसच्या कलर कॉम्बिनेशनवर बातचीत केली. तर काहींनी ड्रेसच्या किमतीवर टीका केली.

अक्षता मूर्ति यांच्या ड्रेसवरून ट्रोलर्सनी सुनावले

एका सोशल मीडिया यूजरने अक्षता मूर्ति यांच्या ड्रेसच्या किंमतीवर प्रतिक्रिया देत लिहिलं, "अक्षता मूर्तिचा ड्रेस एक स्टीरियोग्राम आहे आणि जर तुम्ही उशीरापर्यंत तिरक्या नजरेने पाहाल तर तुम्हाला एक विमान कॅलिफोर्नियासाठी रवाना होताना दिसेल." ट्रोलरने हे देखील लिहिलं की, "अक्षता मूर्ति यांच्या ड्रेसवर एक क्यूआर कोड देखील आहे. ज्यातून तुम्हाला डिज्नीलँचा फास्ट पास मिळू शकतो."

अक्षता मूर्ति यांनी परिधान केलेल्या ड्रेसची किंमत किती?

अक्षता मूर्ति यांनी ३९५ पाउंड (४१ हजार रुपये) चा ड्रेस परिधान केला होता. त्या ऋषी यांच्या मागे उभारलेल्या दिसल्या. त्यांची पत्नी अक्षता मूर्ति या नारायण मूर्ति यांच्या कन्या आहेत. ते इन्फोसिसचे फाउंडर आहेत. रिपोर्टनुसार, सुनाक पती-पत्नी यांची संपत्ती अंदाजे ६५१ मिलियन डॉलर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT