कोणताच तणाव नाही | UKच्या नव्या पंतप्रधानांच्या स्वागताला लॅरी बोका सज्ज

१४ वर्षांत ६ व्या पंतप्रधानांसोबत असेल मुक्काम
Larry the cat
ब्रिटनच्या पंतप्रधान निवासस्थानी लॅरी 'प्रमुख उंदिर नियंत्रक' आहे.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क | ग्रेट ब्रिटनच्या पंतप्रधानांचे निवासस्थान म्हणजे १० डाऊनिंग स्ट्रिट. या निवास्थानाने गेल्या १४ वर्षांत बरीच अस्थिरता पाहिली आहे. या कालावधित ५ दिग्गज राजकारणी ब्रिटनचे पंतप्रधान झाले, पण या सगळ्या चढउतारात या निवासस्थानी कायम असलेला कर्मचारी म्हणजे 'लॅरी'. हा लॅरी एक मांजर आहे. लॅरी द कॅट या नावाने सगळे त्याला ओळखतात. आणि महत्त्वाचे म्हणजे त्याच्याकडे या पंतप्रधानांच्या निवासस्थानी राहाण्यासाठी अधिकृतपद आहे. प्रमुख उंदीर नियंत्रक (Chief Mouser) अशी जबाबदारी त्याच्याकडे आहे.

लॅरीने आतापर्यंत पाच पंतप्रधान पाहिले आहेत, आणि तो आता त्याच्या कारकिर्दीतील सहाव्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे लॅरी प्रथमच लेबर पार्टीच्या पंतप्रधानांसोबत कार्यरत असेल.

Summary
  • ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या निवास्थानी लॅरीचा गेली १४ वर्षं मुक्काम

  • लॅरीचे ब्रिटनमध्ये असंख्य चाहते आहेत.

  • लॅरीच्या नावाने सोशल मीडियावर खाते ही आहे.

  • लॅरी भांडखोर बोका म्हणूनही प्रसिद्ध आहे.

  • लॅरीकडे १० डाऊनिंग स्ट्रीटसाठी उंदीर नियंत्रक असे पद आहे

डेव्हिड कॅमेरून यांच्या काळात निवासस्थानी

१० डाऊनिंग स्ट्रीट येथे लॅरीचे आगमन झाले ते १५ फेब्रुवारी २०११ला. लंडनमधील एका शेल्टर हाऊसमधून लॅरीला येथे आणण्यात आले. त्या वेळी डेव्हिड कॅमेरून ब्रिटनचे पंतप्रधान होते. लॅरीला मुख्य उंदीर नियंत्रण अधिकारी असे पदही मिळाले. गंमत म्हणजे लॅरी आणि कॅमेरून यांचे पटत नसल्याच्या चर्चाही तेव्हा रंगल्या होत्या. पंतप्रधानांच्या निवास्थानी होणाऱ्या पत्रकार परिषदांना लॅरीची उपस्थिती ठरलेली असते, असे NDTVच्या बातमीत म्हटले आहे.

सोशल मीडियावर लॅरीचे चाहते बरेच आहेत, आणि @Number10Cat या नावाने लॅरीचे सोशल मीडिया अकाऊंटही आहे. "मी मतदान करत नाही, पण तुम्ही ज्याला निवडता, मी त्याच्यासोबत राहतो. काहीच तणाव नाही," असे या अकाऊंटवर म्हटलेले होते.

"माझ्या दीर्घायुष्याचे कारण आहे मी येथे कायमचा रहिवाशी आहे. राजकीय लोक काय येतात आणि जातात," असेही या अकाऊंटवर म्हटले आहे.

भांडखोर 'लॅरी द कॅट'

विशेष बाब अशी की लॅरीचे मालक हे पंतप्रधान असत नाहीत, त्याची जबाबादारी निवासस्थानातील कर्मचाऱ्यांकडे असते. त्यामुळे पंतप्रधान बदलले तरी लॅरी येथेच राहतो

लॅरी हा भांडखोरही आहे. त्याने आजूबाजूच्या सर्व मांजरांना पिटाळून लावले आहेत. ब्रिटनचे आताचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कुत्र्यासोबतही त्यांची भांडणे झाली होती, असे सुनक यांच्या पत्नी अक्षता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news