UK Election 2024 | ‘मला माफ करा…’, शेवटच्या भाषणात ऋषी सुनक काय म्हणाले?

After UK Election 2024 Rishi Sunak
‘मला माफ करा…’, शेवटच्या भाषणात ऋषी सुनक काय म्हणाले?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: ऋषी सुनक यांच्या पक्षाला ब्रिटनच्या संसदीय निवडणुकीत अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर ऋषी सुनक यांनी पंतप्रधान म्हणून शेवटचे भाषण दिले आहे. यावेळी ब्रिटनचे माजी पंतप्रधान सुनक यांनी "मला माफ करा! आजचा दिवस खूप कठीण आहे" असे म्हटले आहे.

ऋषी सुनक म्हणाले की, प्रथम मी देशाला सॉरी म्हणू इच्छितो. या पदावर असताना मी माझे सर्वस्व दिले, पण तुमच्या आदेशाने तुम्हाला बदल हवा आहे असा स्पष्ट संदेश दिला आहे. तुमची निवड आता महत्त्वाची आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी मी घेतो, या निकालानंतर मी पक्षनेतेपदावरून पायउतार होत आहे.

'हा कठीण दिवस...'; ऋषी सुनक भावुक

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पुढे म्हटले आहे की, 'अनेक कठीण दिवसांनंतर हा कठीण दिवस आहे. ब्रिटन हा जगातील सर्वोत्कृष्ट देश आहे आणि याचे श्रेय संपूर्णपणे तुम्हा ब्रिटीश जनतेला जाते, असेही ते म्हणाले.

कीर स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान

ब्रिटनच्या संसदीय निवडणुकीमध्ये (UK general election) ‍‍‍विरोधी लेबर पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. ६५० जागा असलेल्या ब्रिटनच्या संसदेत लेबर पक्षाने ३७० हून अधिक जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे. यामुळे लेबर पक्षाचे नेते कीर स्टार्मर (Keir Starmer) हे नवे पंतप्रधान (UK Prime Minister) होणार आहेत. तर सध्याचे पंतप्रधान ऋषी सुनाक (Rishi Sunak) यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे विरोधी लेबर पक्ष १४ वर्षानंतर सत्तेत वापसी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news