UK General Election | कोण आहेत कीर स्टार्मर?; ज्यांनी दिला ऋषी सुनाक यांना धक्का

ब्रिटनमध्ये सत्ताबदल! कीर स्टार्मर होणार नवे पंतप्रधान
UK General Election Keir Starmer
लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहे.Keir Starmer X account
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत (UK General Election) विरोधी लेबर पार्टीने मोठा विजय मिळवला आहे. ६५० जागा असलेल्या संसदेत लेबर पार्टीने ४१० जागांवर विजय मिळवत बहुमत सिद्ध केले आहे. यामुळे लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर (Keir Starmer) हे नवे पंतप्रधान होणार आहे. तर या निवडणुकीत भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांच्या नेतृत्वाखालील कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला पराभवाचा मोठा धक्का बसला. कॉन्झर्वेटिव्हला ११९ जागांवर समाधान मानावे लागले. सुनाक यांनी पराभव मान्य केला आहे. तर लेबर पार्टीने १४ वर्षानंतर ब्रिटनमधील सत्तेत वापसी केली आहे.

Summary

महत्त्वाचे मुद्दे

  • ब्रिटन संसदेत लेबर पार्टीला स्पष्ट बहुमत.

  • ऋषी सुनाक यांच्या नेतृत्वाखालील कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला पराभवाचा मोठा धक्का.

  • ब्रिटनमध्ये १४ वर्षांनतर पहिल्यांदाच लेबर पार्टीचा नेता होणार पंतप्रधान.

  • कीर स्टार्मर हे आता ऋषी सुनाक यांची जागा घेतील.

  • पहिल्यांदा संसदेवर निवडून आल्यानंतर केवळ ९ वर्षांनी स्टार्मर पंतप्रधानपदावर विराजमान होतील.

  • मानवाधिकार वकील म्हणून त्यांनी काम केले आहे.

सुनाक यांनी त्यांचा पराभव मान्य केल्यामुळे ६१ वर्षीय स्टार्मर हे ब्रिटनचे पंतप्रधान बनणारे सर्वात वयस्कर व्यक्ती असतील. ते पहिल्यांदा संसदेवर निवडून आल्यापासून केवळ नऊ वर्षांनी पंतप्रधानपदावर विराजमान होतील.

अनेक हायप्रोफाइल खटले लढवले

सीएनबीसीच्या वृत्तानुसार, स्टार्मर यांचा जन्म १९६२ मध्ये लंडनमध्ये झाले. त्यांचे वडील टूलमेकर म्हणून काम करत होते. तर त्यांच्या आई नर्स होत्या. लीड्स विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करण्यासाठी जाणारे स्टार्मर हे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती होते. ऑक्सफर्ड विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९८७ मध्ये बॅरिस्टर अथवा ब्रिटीश ट्रायल ॲटर्नी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये शेल, मॅकडोनाल्ड आणि कंझर्व्हेटिव्हचे माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी कोळसा खाणी बंद करण्यासारख्या हायप्रोफाइल खटले लढवले.

UK General Election Keir Starmer
UK general election| कीर स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान, ऋषी सुनाक यांना पराभवाचा धक्का

मानवाधिकार सल्लागार

स्टार्मर यांनी माजी कामगार पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या उत्तर आयर्लंड गुड फ्रायडे कराराच्या वेळी मानवाधिकार सल्लागार म्हणूनही काम केले. ते माजी मानवाधिकार वकील आणि सरकारी वकील म्हणून ओळखले जातात. २००८ मध्ये त्यांचे व्हिक्टोरिया यांच्या लग्न झाले. लग्नाच्या एका एका वर्षानंतर स्टार्मर सार्वजनिक अभियोजनाचे संचालक बनले आणि त्यांना ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या प्रमुखपदी नियुक्त केले.

उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वोच्च सन्मान

२०१४ मध्ये स्टार्मर यांना गुन्हेगारी न्यायासाठीच्या त्यांच्या सेवांसाठी नाइट या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पुढच्या वर्षी ते संसदेवर निवडून गेले. त्यांनी इमिग्रेशन मंत्री आणि विरोधी पक्षाचे ब्रेक्झिट मंत्री म्हणून काम केले.

UK General Election Keir Starmer
भारत-ब्रिटन ऐतिहासिक पाऊल टाकतील?

लेबर पार्टीच्या नेतेपदी निवड

२०२० मध्ये त्यांची लेबर पार्टीचे नेते म्हणून निवड करण्यात आली. जेरेमी कॉर्बिन यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आली. कारण २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला पराभवाचा धक्का बसला होता.

स्टार्मर आहेत फुटबॉल प्रेमी

स्टार्मर यांच्यावर अनेकदा संधीसाधू नेता म्हणून आरोप झाला. स्टार्मर हे एक असे व्यक्ती आहेत जे एखाद्या मुद्द्यावर वारंवार आपली भूमिका बदलतात. त्यांच्याकडे देशाबद्दल स्पष्ट दृष्टीकोण नसल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. विशेष म्हणजे स्टार्मर हे फुटबॉलप्रेमी असून ते आर्सेनल फुटबॉल क्लबचे चाहते आहेत.

लेबर पार्टीने जाहीरनाम्यात काय दिली होती आश्वासने?

पार्टीच्या निवडणूक जाहीरनाम्यात स्टार्मर यांनी नवीन सार्वजनिक मालकीची ऊर्जा कंपनी तयार सुरु करणे, राष्ट्रीय आरोग्य सेवेसाठी होणारी प्रतीक्षा कमी करणे, नवीन घरे बांधणे आणि रेल्वे सेवांचे सुसूत्रीकरण करण्याचे आश्वासने दिली होती. "आर्थिक वाढ आणि सामाजिक न्याय यात समन्वय असायला हवा," असे स्टार्मर यांनी पार्टीच्या जाहीरनामा प्रसिद्धी कार्यक्रमात म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news