आंतरराष्ट्रीय

Strait of Hormuz | 'होर्मुझ' बंद होताच 'या' चिमुकल्या देशाला लागली लॉटरी!; एका टँकरसाठी तब्‍बल ३७ कोटींची वसुली!

Strait of Hormuz blockade | प्रवास महागल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर होतोय थेट परिणाम

पुढारी वृत्तसेवा

Strait of Hormuz blockade

नवी दिल्‍ली : अमेरिका, इस्‍त्रायलने इराणवर २८ फेब्रुवारी रोजी हल्‍ला केला. हा संघर्ष चिघळला. तेव्‍हापासून भारतासह जगातील अनेक देश तेल संकटाचा सामना करत आहेत. तेल पुरवठ्यावरुन अनेक देश चिंताग्रस्‍त असताना पश्‍चिम आशियातील पनामा या चिमुकल्‍या राष्‍ट्राला मोठा फायदा झाला आहे. पश्चिम आशियातील युद्ध आणि होर्मुजच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) नाकेबंदीमुळे जागतिक व्यापाराची समीकरणे बदलली आहेत. पनामा सरकार या जागतिक संकटाचा फायदा घेत प्रचंड कमाई करत आहे.

'होर्मुझ' असुरक्षित, 'पनामा' सुरक्षित

जगातील एकूण तेल वापरापैकी सुमारे २० टक्‍के हिस्सा होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होतो. पनामा कालवा आणि होर्मुज सामुद्रधुनी या दोन्ही जगातील अत्यंत महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांपैकी एक आहेत.दीड महिन्‍यापेक्षा अधिक काळ इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्षामुळे हा मार्ग पूर्णपणे असुरक्षित झाला आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या मेक्सिको आखातातून आशियाकडे जाणारा शिपिंग कंपन्यांकडे पनामा कालवा हाच सर्वात सुरक्षित आणि प्रमुख पर्यायी मार्ग उरला आहे. अनेक मालवाहू जहाजे सुरक्षिततेसाठी अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरातील मार्गांचा वापर करतात, ज्याचा केंद्रबिंदू पनामा कालवा आहे.तेल आणि वायू वाहून नेणारी जहाजे आता मोठ्या संख्येने पनामा कालव्याकडे वळत आहेत, ज्यामुळे तेथील ट्रॅफिकने विक्रमी पातळी गाठली आहे.

३७ कोटी रुपये पर्यंतची अतिरिक्त बोली

पनामा कालवा प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरून लवकरात लवकर पुढे जाण्यासाठी शिपिंग कंपन्यांनी ४० लाख डॉलर (सुमारे ३७ कोटी रुपये) पर्यंतची अतिरिक्त बोली लावली आहे.

मोठी वेटिंग लिस्ट, लिलावात मोडले सर्व विक्रम

पनामा कालव्यातून जाण्यासाठी सामान्यतः एक निश्चित दर असतो, परंतु ज्या जहाज राखीव केले जात नाही. त्यांच्यासाठी प्राधिकरण लीलाव आयोजित करते. यात जो सर्वात मोठी बोली लावतो, त्याला प्राधान्याने मार्ग दिला जातो. होर्मुजमधील नाकेबंदीमुळे पनामा कालव्यावर जहाजांची संख्या इतकी वाढली आहे की, आता तेथे लांबच लांब वेटिंग लिस्ट तयार झाली आहे.

अतिरिक्त किंमत पोहोचली ४.२५ लाख डॉलरवर

एका जहाजाला पार करण्यासाठी सरासरी खर्च ३ ते ४ लाख डॉलर दरम्यान असतो. पूर्वी कंपन्या लवकर निघण्यासाठी २.५ ते ३ लाख डॉलर अतिरिक्त द्यायच्या; परंतु गेल्या काही आठवड्यांत ही सरासरी अतिरिक्त किंमत ४.२५ लाख डॉलरवर पोहोचली आहे. पनामा कालव्याचे प्रशासक रिकाउर्ते वास्क्वेज यांनी खुलासा केला की, एका इंधन वाहू जहाजाने आपले मुक्‍कामाचे स्थान बदलण्यासाठी आणि लवकर पोहोचण्यासाठी ४० लाख डॉलरची अतिरिक्त बोली लावली. हे जहाज युरोपला जात होते, परंतु इंधनाच्या कमतरतेमुळे ते सिंगापूरच्या दिशेने वळवण्यात आले.

पनामाचे वाढले महत्त्व

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे होर्मुजचा मार्ग आता अत्यंत धोकादायक झाला आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या भीतीने कंपन्या पनामा कालव्याला सुरक्षित पर्याय मानत आहेत. पनामाचे प्रसिद्ध विश्लेषक रोड्रिगो नोरिएगा यांच्या मते, पनामा सरकार या जागतिक संकटातून होणारी कमाई वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर मोठा दबाव येत आहे.

महागाई वाढण्याची शक्यता

पनामा कालव्याचा प्रवास महागल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर थेट परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून येणाऱ्या काळात तेल, वायू आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT