Hormuz Strait Shipping Crisis | होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ब्रिटन,फ्रान्सने घेतला पुढाकार!

Hormuz Strait Shipping Crisis | ४० हून अधिक देशांची शुक्रवारी होणार 'व्हिडिओ कॉन्फरन्स'वर परिषद
Hormuz Strait Shipping Crisis
प्रातिनिधिक छायाचित्र.file photo
Published on
Updated on

Hormuz Strait Shipping Crisis

पॅरिस : जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची 'होर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय जहाज वाहतुकीसाठी खुली करण्याच्या उद्देशाने फ्रान्स आणि ब्रिटनने पुढाकार घेतला आहे. दोन्ही देशांनी ४० हून अधिक राष्ट्रांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी एका विशेष परिषदेचे आयोजन केले असून, याद्वारे या मार्गावरील नौकानयनाचे स्वातंत्र्य पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शांततापूर्ण आणि संरक्षणात्मक मोहीम

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 'एक्‍स' वर यासंदर्भात माहिती दिली. या शुक्रवारी पॅरिसमध्ये एका 'व्हिडिओ कॉन्फरन्स'चे आयोजन करण्यात आले आहे. मॅक्रॉन म्हणाले की, "फ्रान्स आणि युनायटेड किंगडम या शुक्रवारी एका परिषदेचे यजमानपद भूषवणार आहेत. यामध्ये युद्धात सामील नसलेले देश सहभागी होतील. ही मोहीम बहुपक्षीय आणि पूर्णपणे संरक्षणात्मक स्वरूपाची असेल, जेणेकरून सुरक्षा परिस्थिती सुधारताच या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक पुन्हा सुरू करता येईल."

Hormuz Strait Shipping Crisis
energy crisis warning | "१९७० मधील ऊर्जा संकटापेक्षाही भीषण परिस्थिती!" : IEA संचालकांनी नेमका कोणता इशारा दिला?

जागतिक महागाईवर होणार परिणाम

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी म्हटले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जागतिक स्तरावर मोठा फटका बसत आहे. सामुद्रधुनी बंद राहिल्याने झालेली कोंडी अत्यंत नुकसानकारक आहे. जीवनमानाचा खर्च आणि महागाई कमी करण्यासाठी जागतिक जहाज वाहतूक सुरू होणे आवश्यक आहे. ४० हून अधिक देशांनी आमच्या या उद्दिष्टाला पाठिंबा दिला आहे," असे स्टार्मर यांनी नमूद केले.

Hormuz Strait Shipping Crisis
Donald Trump Iran threat | "...नाहीतर तुम्ही नरकात जगाल" : अर्वाच्य भाषेचा वापर करत ट्रम्‍प यांनी दिली इराणला धमकी

मॅक्रॉन यांची ट्रम्‍प यांच्‍याशी चर्चा

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी मंगळवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही चर्चा केली. सर्व पक्षांनी शस्त्रसंधीचा आदर करावा आणि यामध्ये लेबनॉनचाही समावेश असावा, असा आग्रह त्यांनी धरला आहे. पाकिस्तानमध्ये (इस्लामाबाद) अमेरिका आणि इराण दरम्यान २१ तास चाललेली मॅरेथॉन चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता फ्रान्स आणि ब्रिटनचा हा प्रस्ताव कोंडी फोडण्यात यशस्वी ठरणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Hormuz Strait Shipping Crisis
DONALD TRUMP |युद्धात मदतीस नकार अन् ट्रम्प यांचा वार..! थेट फ्रान्सच्या फर्स्ट लेडींचे 'घरगुती' भांडणच आणले चव्हाट्यावर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news