North Korea Fired Missile pudhari
आंतरराष्ट्रीय

North Korea Fired Missile: किंम जोंग उन देखील पेटले; थेट १० मिसाईल सोडली... जपाननं केली इमर्जन्सी रिस्पोन्स टीम अॅक्टिव्हेट

Anirudha Sankpal

North Korea Fired Missile: दक्षिण कोरिया डिफेन्स मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नॉर्थ कोरियाने शनिवारी अज्ञात प्रोजेक्टाईल लाँच केलं. हे पाऊल उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाचा शांती प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर आठवड्याभरत उचलण्यात आलं आहे.

दक्षिण कोरियाने असे मिसाईल लाँच झाल्याची पुष्टी केली आहे. आपल्या छोट्याशा वक्तव्यात दक्षिण कोरियाने या मिसाईलबाबतची अधिक माहिती किंवा त्याच्या रेंज बाबतची माहिती सांगितलेली नाही.

दरम्यान, जपान कोस्ट गार्डने नंतरच्या वृत्तात उत्तर कोरियातून स्थानिक वेळेनुसार जवळपास १.३० पीएम ला बॅलेस्टिक मिसाईल लाँच केल्याचं दिसत आहे. यासाठी त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या माहितीचा हवाला दिला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे मिसाईल जपानच्या एक्सक्लुजीव इकॉनॉमिक झोनच्या जवळ समुद्रात पडलं.

यानंतर जपानने त्वरित इमर्जन्सी रिस्पोन्स टीम स्थापन केली असून पंतप्रधान कार्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन केंद्रातून ती अॅक्टिव्हेट करण्यात आली आहे. ते परिस्थितीची पाहणी करणार आहेत आणि कोणतं नुकसान झालं आहे का याची देखील पाहणी करणार आहेत.

अमेरिकेच्या उपस्थितीत नव्याने कुटनितीक चर्चा सुरू असतानाच हे मिसाईल दागण्यात आले आहेत. दक्षिण कोरियाचे पंतप्रधान किम मिन सेओक यांनी अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांना विश्वास आहे की नॉर्थ कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यासोबतची बैठक चांगली होईल. या दोघांमधील चर्चा वॉशिंग्टनमध्ये होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT