US Doomsday Missile Test: अमेरिकेनं डूम्स डे क्षेपणास्त्राची चाचणी करताच जगाला का भरलीये धडकी?

US Doomsday Missile Test
US Doomsday Missile Testpudhari
Published on
Updated on

US Doomsday Missile Test: मध्यपूर्व आशियात युद्धाचा जोरदार भडका उडाला आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यातील लष्करी संघर्षात आता अमेरिका, आखाती देश उतरले आहेत. तर युरोपातील देशही युद्धात उतरण्याच्या तयारीत आहेत. इराणने आता कोणतीही चर्चा नाही असं म्हणत युद्ध लांबवण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच दोन्ही बाजूंनी मोठी जीवित आणि वित्त हानी होत असतानाच अमेरिकेने एक मोठं पाऊल उचलल्यामुळं संपूर्ण जगाला धडकी भरली आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार सांता बारबरा जवळ वँडेनबर्ग स्पेर फोर्स बेसमधून रात्री ११ वाजता मिनटमॅन १११ बॅलिस्टिक मिसाईल लाँच करण्यात आली. हे क्षेपणास्त्र हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अण्विक बॉम्बच्या तुलनेत २० पट अधिक शक्तीशाली न्युक्लिअर वॉरहेड्स घेऊन जाण्यास सक्षम आहे.

युएस स्पेस फोर्सच्या म्हणण्यानुसार जीटी २५४ च्या स्वरूपात ओळखले जाणेर शस्त्रविरहीत रॉकेट पश्चिम - मध्य पॅसिफिक महासागरात मार्शल द्वीपजवळ आपल्या टार्गेटजवळ जाऊन पडलं. फोर्स ग्लोबल स्ट्राईक कमांडने दिलेल्या माहितीनुसार क्षेपणास्त्राचा प्रभाव, तत्परता आणि अचूकता याची चाचणी करण्यासाठी हे क्षेपणास्त्र सोडण्यात आलं होतं.

५७६ फ्लाईंग टेस्ट स्क्वाड्रन कमांडर लेफ्टनंट कर्नल कॅरी व्रे यांनी एका प्रेस रिलीजमध्ये सांगितलं की, 'याद्वारे आम्ही मिसाईल सिस्टमच्या वेगवेगळ्या घटकांच्या कामगिरीचे मुल्यमापन करण्याची संधी मिळते.'

संपूर्ण मध्यपूर्व युद्धात

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला करत आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचा तेहरानमध्ये मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण मध्यपूर्व आशिया हा युद्धात लोटला गेला.

खामेनी यांच्या हत्येनंतर इराणने इस्त्रायल आणि आखाती देशात अमेरिकेच्या सर्व सैन्य ठिकाणांवर हल्ले करण्यास सुरूवात केली. तिकडे हिज्बुल्लाह देखील अॅक्टिव्ह झाला आहे. त्यामुळं इस्त्रायलनेलेबनानची राजधानी बेरूतवर देखील हल्ले चढवले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर होणारे हल्ले अजून तीव्र करण्याची शपथ घेतली आणि त्यांनी मोठ्या हल्ल्याचा देखील इशारा दिला.

डूम्स डेची चाचणी का?

एअर फोर्स ग्लोबल स्ट्रीक कमांडने सांगितलं की, 'मंगळवारी करण्यात आलेली चाचणी ही नियमित चाचणी होती. या चाचणीची आखणी अनेक वर्षापूर्वी करण्यात आली होती. मिनटमॅन १११ मिसाईल अमेरिकेच्या न्युक्लिअर ट्राअँगलचा एक भाग आहे. यात जमीन, समुद्र आणि हवा या मार्गाद्वारे जगाचा विनाश करणारे शस्त्र लाँच करण्याची क्षमता आहे.

याला न्युक्लिअर युद्ध रोखण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. मात्र जर अमेरिकेवर न्युक्लिअर हल्ला झाला तर पुन्हा न्युक्लिअर हल्ला करण्यास सक्षम आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेनं पुन्हा न्युक्लिअर बॉम्बचं टेस्टिंग सुरू करण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात देखील मिनटमॅन १११ मिसाईल लाँच करण्यात आली होती.

मिनटमॅन १११ काय आहे?

मिनटमॅन १११ हे अमेरिकेचे सर्वात जुने आयसीबीए क्षेपणास्त्र आहे. १९७० पासून या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून लाँच करण्यात येते. याची रेंज १३ हजार किलोमीटर इतकी असून हे न्युक्लिअर वॉरहेड घेऊन जाण्यास सक्षम आहे. मात्र नुकत्याच झालेल्या चाचणी कोणतं वॉरहेड नव्हतं.

अमेरिकेडवळ अशी जवळपास ४०० क्षेपणास्त्रे आहेत रशिया आणि चीन सारख्या देशांपासून संरक्षण करण्याच्या मोहिमेचा ते भाग आहेत. प्रत्येक मिसाईल ही मिनिटमॅन नावानं ओळखली जाते. कारण हे क्षेपणास्त्र एका मिनिटात तयार होतं. अमेरिका २०३० पर्यंत नवीन क्षेपणास्त्रांनी यांना रिप्लेस करण्याची योजना बनवत आहे. मात्र तोपर्यंत या चाचण्या सुरूच राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news