Nepal Ban Indian Mango pudhari
आंतरराष्ट्रीय

Nepal Ban Indian Mango: नेपाळने भारताच्या आंब्यांवर घातली बंदी... सख्ख्या शेजाऱ्यांनी केला मोठा कांड; आता मोठी किंमत चुकवणार?

Anirudha Sankpal

Nepal Ban Indian Mango: भारत आणि नेपाळ यांच्यातील परराष्ट्र संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. याचदरम्यान, नेपाळने एक मोठा निर्णय घेऊन भारतीय आंब्यांना आपल्या देशात प्रवेश बंदी लागू केली आहे. नेपाळने भारतीय आंब्यांवर जास्त किटकनाशके फवारली असल्याचा दावा केला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा निर्णय स्थानिक फळ उत्पादकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांना बळ देण्यासाठी घेण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र नेपाळ सरकारच्या या निर्णयामुळं बाजारात व्यापाऱ्यांना पुरवठ्यासंबंधी समस्यांना तोडं द्याव लागू शकतं.

आंबा रोखण्याचं कारण काय?

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार कथित स्वरूपात भारतीय आंब्यांवर जास्त किटकनाशके आढळून आली आहेत. तसेच सीमेवरील भागात क्वारंटीनची सोय नसल्याचे सांगित नेपाळने भारतातून आयात होणाऱ्या आंब्यांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. भारतीय आंब्यांवर नियमापेक्षा जास्त किटकनाशके आढळून आली आहेत. तसेच सीमेवरील भागात पुरेशी क्वारंटीनची सुविधा नाही. त्यामुळं हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

नेपाळच्या बाजाराची अवस्था टाईट

रायजिंग नेपाळच्या रिपोर्टनुसार, भारतीय आंब्यांवर निर्बंध लादल्यानंतर जनकपुरधामच्या बाजारात स्थानिक आंब्यांची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. अनेक फळ विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार सरकारच्या या निर्णयामुळं पुरवठा आणि व्यापाराबाबत मोठ्या समस्या येत आहेत. या निर्णयामुळं नेपाळच्या स्थानिक बाजारात स्थानिक आंब्याची उपलब्धता वाढली आहे. उन्हाळ्यात सहसा आंब्यांची मागणी जास्त असते.

व्यापाऱ्यांचे काय म्हणणे?

नेपाळच्या वेबसाईटशी बोलताना एका व्यापाऱ्याने सांगितलं की देशांतर्गत उत्पादन वाढवणे योग्य आहे. मात्र दीर्घकालीन रणनिती न आखता हा बॅन घातल्यामुळं व्यापारात मोठी अडचण निर्माण होत आहे. नेपाळी आंब्यांचे उत्पादन हे फक्त दोन महिने असतं. त्यामुळं उर्वरित गरज भागवण्यासाठी भारतातून आयात झालेला आंबा महत्वाचा होता.

बाजारात तुटवडा होऊ शकतो.

जनकपूरधामच्या फळ आणि भाजी व्यापारी संघाचे महासचिव भुवनेश्वर पुर्बे यांनी सांगितलं की उन्हाळ्यात आंब्यांची मागणी वाढते. भारतीय आंब्यांवरील बंदीमुळं बाजारात आंब्यांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. फक्त स्थानिक उत्पादनाने पूर्ण बाजाराची मागणी पूर्ण करणे अवघड आहे.

केळ्याचे उदाहरण

भुवनेश्वर पुर्बे यांनी सांगितलं की भारतीय केळी स्वस्त असतात. मात्र पुरवठा थांबल्यानंतर त्यांच्या किंमतीत वाढ झाली. आता हिवाळ्यात स्थानिक उत्पादन कमी होते. त्यावेळी व्यापारी भारतातून आयात केलेल्या केळ्यावरच अवलंबून होता. जर ही बंदी दीर्घकाळ राहिली तर ग्राहकांना जास्त किंमत देऊन केळी खरेदी करावी लागतील. उद्योगाला मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

जपानने देखील घातली बंदी

काही दिवसांपूर्वी जपान सरकारने देखील वेपर हीट ट्रीटमेंट स्टँडर्ड मीट न करू शकल्यामुळं भारतीय आंब्यांवर बंदी घातली होती. जवळपास दोन दशकानंतर जपानने भारतीय आंब्यांवर अशी बंदी घातली होती. भारताच्या अमरोहा जिल्ह्यातील जवळपास १२ हजार हेक्टरमध्ये पसरलेल्या आंब्यांच्या बागांमधून दर वर्षी मोठ्या प्रमाणावर आखाती देशात, अमेरिका, जपान आणि युरोपात आंब्याची निर्यात केली जाते.

स्थानिक निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार जपानची ही कारवाई एका इशाऱ्यासारखी आहे. यानंतर आता किटकनाशके आणि पॅकेजिंगसाठी जागतिक स्टँडर्डवर अजून गांभिऱ्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT