Donald Trump on Iran : "इराणचे सर्वोच्च लष्करी नेतृत्व नष्ट करण्यात आले आहे. देशाचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मुलगा मोजतबा खामेनी हा ९० टक्के निकामी झाला आहे," असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'फॉक्स न्यूज'शी बोलताना केला. तसेच इराणकडे आता नौदल आणि हवाई दल नाही. या देशाचे सर्व काही संपले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला आहे. हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू आहेत. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत "इराणची नाकेबंदी" पुन्हा लागू करण्याची योजना जाहीर केली आहे. इराणकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १३ जुलै) 'फॉक्स न्यूज'शी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलने अलीकडेच केलेल्या समन्वित लष्करी हल्ल्यांमुळे इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे नष्ट झाली आहे. या देशाकडे आता नौदल नाही. त्यांच्याकडे हवाई दल नाही. सर्व काही संपले आहे. त्यांची विमानविरोधी यंत्रणा नष्ट झाली आहे. त्यांचे सर्व नेते मारले गेले आहेत."
अमेरिकेने राबवलेल्या मोहिमेदरम्यान इराणचे वरिष्ठ लष्करी नेतृत्व नष्ट करण्यात आले. त्यांचे सर्वोत्तम नेते मारले गेले आहेत. ते संपले आहेत. खोमेनी संपले आहेत. मोजतबा खामेनी यांना दीर्घकाळापासून त्यांचे दिवंगत वडील अयातुल्ला अली खामेनी यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रमुख दावेदार मानले जात होते. ते देखील जवळपास संपले आहेत. तो ९०% संपला आहे," असे ट्रम्प एका व्हायरल क्लिपमध्ये म्हणताना ऐकू येतात.
दरम्यान, मोजतबा खामेनी हे आधीच्या हवाई हल्ल्यात झालेल्या गंभीर दुखापतीतून सावरत असल्याचे इराणने यापूर्वी जाहीर केले आहे. नुकतेच अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार सोहळ्यावेळी ते अनुपस्थित होते.