मायक्रोसॉफ्टच्या सेवा शुक्रवारी जगभरात ठप्प झाल्याचा फार मोठा फटका बसला. File Photo
आंतरराष्ट्रीय

Microsoft ला आउटेजचा मोठा फटका, काही तासांतच उडाले २३ अब्ज डॉलर्स

मायक्रोसॉफ्ट, CrowdStrike चे शेअर्स घसरले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मायक्रोसॉफ्टच्या सेवा शुक्रवारी जगभरात ठप्प (Microsoft Global Outage) झाल्याचा फार मोठा फटका विमान, आरोग्य सेवा, शिपिंग, औद्योगिक अस्थापने, शेअर बाजार, बँका आणि युजर्संना बसला. सुरक्षा सॉफ्टवेअर अपडेटमध्ये झालेल्या चुकीमुळे जगभरात हे आउटेज झाले. दरम्यान, काही तासांतच मायक्रोसॉफ्टच्या बाजार भांडवलाचे अंदाजे २३ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.

मायक्रोसॉफ्ट शेअर्समध्ये घसरण

मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प झाल्याचे पडसाद शुक्रवारी अमेरिकेतील शेअर बाजारात उमटले. डेटा इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म स्टॉकलिटिक्सच्या मते, मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची किंमत ४४३.५२ डॉलरवरून ४४०.३७ डॉलरपर्यंत खाली आली.

CrowdStrike चे शेअर्स ११ टक्क्यांनी घसरले

शुक्रवारच्या जगभरातील आउटेजमुळे CrowdStrike चे शेअर्स ११ टक्क्यांनी घसरले. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्या सेंटीनेलवन (S.N) आणि पावलो अल्टो नेटवर्क यांचे शेअर्स अनुक्रमे ८ टक्के आणि २ टक्क्यांनी वाढले. तर मायक्रोसॉफ्टचे शेअर्स ०.७ टक्क्यांवी खाली आले. तसेच अमेरिकेच्या शेअर बाजारातील तिन्ही प्रमुख निर्देशांक नकारात्मक पातळीवर बंद झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज जवळपास १ टक्के घसरला. S&P 500 ०.७ टक्क्यांनी घसरला तर टेक-हेवी नॅस्डॅक कंपोझिट ०.८ टक्क्यांनी घसरला.

क्राउडस्ट्राईक नेमकं काय आहे?

क्राउडस्ट्राईक हा प्लॅटफॉर्म सिक्योरिटी सुविधा पुरवतो. हा टेक उद्योगातील सर्वात मोठ्या ऑपरेटरपैकी एक म्हणून ओळखला जाते. पण त्यांच्या सॉफ्टवेअर अपडेटमध्ये झालेल्या चुकीमुळे जगभरातील मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प झाल्या. या सायबर सिक्युरिटी फर्म CrowdStrike (CRWD.O) द्वारे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आले होते. त्यानंतर यूजर्सना Microsoft 365 सह दुसऱ्या सेवांना आउटेजच समस्येचा सामना करावा लागला. या आउटेजमुळे मायक्रोसॉफ्ट ऑपेरटिंग सिस्टमवर चालणारे कम्यूटर ऑटोमेटिकली रिस्टार्ट होत होते. या तांत्रिक समस्येला ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हटले जाते. क्रॉउडस्ट्राइक अपडेटमुळे ब्लू स्क्रीन ऑफ डेथची समस्या निर्माण झाली असल्याचे टेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT