Microsoft Windows Outage | खरोखर सायबर हल्ला की इतर काही? Crowdstrikeचा मोठा खुलासा

CrowdStrikeचे म्हणणे काय?
Microsoft Windows Outage
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प झाल्याचा फार मोठा फटका बसला आहे.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प झाल्याचा फार मोठा फटका औद्योगिक अस्थापना, शेअर बाजार, बँका आणि युजर्सना बसला आहे. दरम्यान हा प्रकार सायबर हल्ला आहे का, अशी शंकाही अनेकांकडून व्यक्त होत होती. यावर आता CrowdStrikeने मोठा खुलासा केलेला आहे.

CrowdStrike चे म्हणणे काय?

क्राऊडस्ट्राईक हा प्लॅटफॉर्म सिक्युरीटी सुविधा पुरवतो. क्राऊडस्ट्राईकचे सीईओ जॉर्ज कुर्ज यांनी या प्रकरणावर X पोस्ट करत खुलासा केला आहे. ते म्हणाले, "हा प्रकार सिक्युरिटिशी छेडछाड किंवा सायबर हल्ला नाही. विंडोजच्या होस्टमध्ये सिंगल कंटेट अपडेटमध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत. या त्रुटी शोधण्यात आल्या आहेत, आणि दुरुस्ती करण्यात आलेली आहे."

ते म्हणाले, "आम्ही वापरकर्त्यांना सपोर्ट पोर्टलवर रेफर करत आहोत, तिथे त्यांना लेटेस्ट अपडेट मिळतील, तसेच ज्या कंपन्या क्राऊडस्ट्राईकच्या सेवा घेत आहेत, त्यांनी आमच्या अधिकृत कंपनीशी संपर्क साधावा. क्राऊडस्ट्राईकच्या ग्राहकांची सुरक्षा आणि स्थैर्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे." असे बिझनेस टुडेच्या बातमीत म्हटले आहे.

CrowdStrike म्हणजे काय? What is CrowdStrike?

CrowdStrike (काऊडस्ट्राईक) हा सायबर सिक्युरिटीशी संबंधित प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म युजर्स आणि बिझनेस यांना सिक्युरिटी सोल्युशन देते. काऊडस्ट्राईक सिंगल सेन्सरपद्धतीने रिअलटाईममध्ये सिक्युरिटी देते. क्राऊडस्टाईकमध्ये फाल्कन सेन्सर असतात. क्राऊडस्ट्राईकमध्ये एक अपडेट करण्यात आले होते, यातील उणिवामुळे क्राऊडस्ट्राईकच्या फाल्कन सेन्सरमध्ये बिघाड झाला. हा बिघाड विंडोच्या सिस्टमध्ये एकप्रकारे विरोधाभास निर्माण झाला आणि त्यातून या आऊटेजची स्थिती निर्माण झाली.

क्राऊडस्ट्राईकने या त्रुटी मान्य केल्या आहेत. "आमचे इंजिनिअर तत्परतेने ही समस्या सोडवत आहेत. ही दुरुस्ती झाल्यानंतर वापरकर्त्यांना कळवण्यात येईल." तर मायक्रोसॉफ्टने Azure मधील त्रुटी शुक्रवारी सकाळी दूर केल्या असल्याचे सांगितले आहे.

Blue Screen of Death म्हणजे काय?

विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर गंभीर समस्या दाखवण्यासाठी निळी स्क्रीन दाखवली जाते. याला Blue Screen of Death (BSOD) असे म्हटले जाते. जेव्हा सुरक्षितरीत्या काम करण्यापासून सिस्टमला रोखणारी गंभीर समस्या निर्माण होते तेव्हा, ही स्क्रीन दिसते. त्यातून सिस्टम आपोआप रिस्टार्ट होते आणि सेव्ह न केलेला डेटा गमवावा लागतो.

Microsoft Windows Outage
Microsoft Windows | CrowdStrike Update - मायक्रोसॉफ्टच्या सेवा का झाल्या ठप्प? जाणून घ्या कारण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news