US Iran War News pudhari
आंतरराष्ट्रीय

US Iran War News: अमेरिका इराणमध्ये सैन्य उतरवणार... युद्ध कधी संपणार? युएस सेक्रेटरी ऑफ स्टेट रूबियोंनी स्पष्टच सांगितलं

Anirudha Sankpal

US Iran War News: अमेरिकेने इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात शस्त्रसंधी जवळापस १० दिवसांनी वाढवली आहे. मात्र दुसरीकडं इस्त्रायल इराणवर तर इराण इस्त्रायल आणि युएसच्या लष्करी तळांवर हल्ला करणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळं अख्ख्या जगाचे लक्ष हा लष्करी संघर्ष कधी थांबणार आणि जगाचं ऊर्जेचं संकट कधी संपुष्टात येणार याकडे लागले आहे. त्यातच अमेरिका इराणमध्ये आपले लष्कर उतरवण्याच्या तयारीत असल्याचे देखील वृत्त आले होते. त्यामुळं युद्ध थांबणार की वाढणार याबाबात संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी मार्को रुबियो यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. मार्को यांनी फ्रान्समध्ये जी ७ देशांच्या सेक्रेटरींशी झालेल्या बैठकनंतर सांगितलं की, 'अमेरिका लष्करी ऑपरेशनमध्ये हे आपल्या ठरलेल्या शेड्युलप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षाही पुढे आहे. योग्य वेळी हा लष्करी संघर्ष थांबवला जाईल. हा काही महिन्यांचा नाही तर काही आठवड्यांचा प्रश्न आहे.'

मार्को रूबियो पुढे म्हणाले, आम्ही मध्य पूर्व आशियात काही लष्करी तुकड्या पाठवल्या आहेत. हे पाऊल राष्ट्रपतींना संकट काळात जास्तीजास्त पर्याय आणि जास्तीजास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी उचलण्यात आलेलं आहे.

मध्य पूर्व आशियातील लष्करी संघर्षाचे स्वरूप वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्को रूबियो यांचे हे वक्तव्य आलं आहे.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना रॉयटर्सला सांगितलं की इराणचे मिसाईल आणि ड्रोन्स हे सौदी अरेबियातील प्रिन्स सुल्तान एअरबेसवर स्ट्राईक करत आहेत. यात अमेरिकेचे १२ जवान जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. या हल्ल्यात अमेरिकेच्या लष्करी उपकरांचे नुकासन झाले आहे.

अमेरिका इराण लष्करी संघर्ष हा २८ फेब्रुवारी रोजी सुरू झाला होता. त्यावेळी युएस, इस्त्रायल यांनी इराणवर एअरस्ट्राईक केला होता. यानंतर जगाचा ऊर्जा संसाधनाचा पुरवठा विस्कळीत झाला. हार्मुझ सामुद्रधुनीवर इराणनं नियंत्रण मिळवत तिथून जाणाऱ्या तेल आणि गॅसच्या टँकरवर हल्ला करण्यास सुरूवात केली. या मार्गाने दररोज जवळपास २० मिलियन बॅरल तेल वाहतूक होत होती.

दरम्यान, रूबियो यांनी जी ७ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत देखील याबाबत काळजी व्यक्त करण्यात आल्याचं सांगितलं. इराण आता या भागातून जाणाऱ्या प्रत्येक मालवाहू जहाजावर टोल आकारत आहे. रूबियो यांनी या मार्गाचा फायदा होणाऱ्या युरोपियन आणि एशियन देशांनी मोफत वाहतुकीसाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी मागणी केली आहे.

अमेरिका या भागात अतिरिक्त सैन्य तुकच्या तैनात करत आहे. यात हजारो मरीन्स आणि एअरबॉर्न ट्रूप्सचा समावेश आहे. त्यामुळं युद्ध अजून वाढणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे. अमेरिका आपलं लष्कर इराणमध्ये उतरवून युद्ध अजून लांब खेचण्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकर संपवून कुटनैतिक मार्गनं तोडगा काढण्याचे संकेत दिले आहेत.

अमेरिकेने इराणसमोर शांततेसाठी १५ पॉईंट्सचा प्रस्ताव पाकिस्तानच्या मार्फत ठेवला आहे. त्यावर इराणने देखील काही मागण्या केल्या आहेत. यावर आता अमेरिका काय उत्तर देते याच्यावर पुढची परिस्थिती अवलंबून आहे. सध्याच्या घडीला तरी दोन्ही देशांमध्ये थेट चर्चा सुरू नाहीये. मात्र पडद्यामागून मध्यस्थाच्या मार्फत वाटाघाटी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT