Japan Earthquake pudhari
आंतरराष्ट्रीय

Japan Earthquake: जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचाही दिला इशारा

Anirudha Sankpal

Japan Earthquake: जपानच्या क्यूशू वेटावर आज ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूंकप झाला आहे. हा भूकंप कुमामोतो क्षेत्रात आला असून त्यानंतर या भागात त्सुनामीचा इशारा दिला आहे. जपान हवामान एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपानंतर समुद्रात १ मीटर पर्यंतच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे. समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याची आणि गरज पडल्यास त्वरित सुरक्षित स्थळी जाण्याची विनंती केली आहे. त्याचदरम्यान, चीनमध्ये देखील भूकंप झाला आहे. किंघाई भागात ५.० रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे.

जपान सरकारने कुमामोतोबरोबरच नागासाकी, कागोशिमा, फुकुओका, सागा, ओईता आणि मियाजाकी प्रांताना देखील आपात्कालीन भूकंपाचा इशारा दिला आहे. हे सर्व भाग हे क्यूशू बेटावर आहेत. याबाबतची माहिती रॉयटर्सने दिली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तरी या भूकंपामुळे कोणत्या नुकसानाचे वृत्त समोर आलेले नाही. स्थानिक प्रशासनानुसार भूंकपाचा काय परिणाम झाला आहे याची माहिती घेणे सुरू आहे. त्याचबरोबर त्सुनामीच्या धोक्यावर देखील लक्ष ठेवण्यात आलं आहे.

जपान जगातील सर्वात जास्त भूकंप येणाऱ्या देशांमधील एक देश आहे. त्यामुळं जपानची भूकंप आणि त्सुनामीचा इशारा देणारी सिस्टम सर्वात चांगल्या सिस्टममध्ये गणली जाते.

ही सिस्टम काही सेकंदातच लोकांना अलर्ट देते. त्यामुळं जीवित आणि वित्त हानी टाळता येते. क्यूशू बेटावर राहणाऱ्या लोकांना सध्या सतर्कतेचे आणि अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येणाऱ्या काही तासात स्थिती स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT