आंततराष्‍ट्रीय नाणेनिधीने शुक्रवारी (दि. ९ मे) सुमारे १ अब्‍ज डॉलर्स कर्जाला मान्‍यता दिल्‍याची माहिती पाकिस्‍तानच्‍या पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.  Pudhari Photo
आंतरराष्ट्रीय

India Pakistan Tension | दहशतवादाला पोसणार्‍या पाकला 'IMF'ने दिले 1 अब्‍ज डाॅलर्सचे कर्ज, भारताने केला तीव्र विरोध

पाकिस्‍तान पंतप्रधान कार्यालयाची माहिती

पुढारी वृत्तसेवा

India Pakistan Tension

अर्थव्‍यवस्‍थेच्‍या चिंधड्या उडालेल्‍या पाकिस्‍तानने आंततराष्‍ट्रीय नाणेनिधी(IMF)कडे कर्जसाठी भीक मागितली होती. दम्‍यान, शुक्रवारी (दि. ९ मे) IMFने सुमारे १ अब्‍ज डॉलर्स कर्जाला मान्‍यता दिली आहे, अशी माहिती पाकिस्‍तानच्‍या पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीने दिलेल्‍या कर्जबाबत बोलताना पाकिस्‍तान पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्‍या निवदेनात म्‍हटले आहे की, पाकिस्तानसाठी १ अब्ज डॉलर्सच्या आयएमएफच्या टप्प्याला मंजुरी देणे हे भारताच्या दबाव निर्माण करण्याच्या धोरणाचे अपयश आहे.'

भारत मतदानापासून दूर राहिला

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तानला प्रस्तावित केलेल्या १.३ अब्ज डॉलर्सच्या बेलआउट पॅकेजवर मतदान करण्यापासून भारत दूर राहिला होता. भारताने यामागील कारण म्हणून इस्लामाबादचा 'आर्थिक मदत वापरण्याच्या एका अत्‍यंत खराब नोंदणी असा उल्लेख केला होता.

भारताने व्‍यक्‍त केली चिंता

शुक्रवार ९ मे रोजी वॉशिंग्टन येथे झालेल्या आयएमएफच्‍या बैठकीत भारताने पाकिस्तानकडून कर्ज अटींची पूर्तता करण्यात वारंवार अपयश आल्याबद्दल चिंता व्यक्त केली. वारंवार मिळणाऱ्या कर्जांमुळे पाकिस्‍तान आयएमएफसाठी "खूप मोठे आणि अयशस्वी" कर्जदार बनले आहे. पाकिस्तानला आयएमएफची मदत देण्यात राजकीय घटकांचीही भूमिका असल्याचे अहवालात म्हटले आहे.

'आयएमएफ'चे पैसे दहशतवादी संघटनांकडे'

पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत अप्रत्यक्षपणे त्याच्या गुप्तचर संस्थांना आणि लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांना मदत करते, जे भारतावर हल्ले करत आहेत, असा पुनरुच्चारही भारताने केला आहे.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था कर्जावर अवलंबून!

पाकिस्‍तानची अर्थव्‍यवस्‍था ही डबघाईला आली आहे. आता केवळ आयएमएफच्या मदतीवर सर्व काही अवलंबून ठोस पावले न उचलता पाकिस्तानला आर्थिक मदत देणे प्रादेशिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते, असे पाकिस्‍तानने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT