Iran US War Russia pudhari
आंतरराष्ट्रीय

Putin On Iran US War: आता पुतीन यांची एन्ट्री... 60 मिनिटांचा वॉर प्लॅन... डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत फोनवर काय बोलले?

Anirudha Sankpal

Putin On Iran US War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात जवळपास एक तास फोनवर चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान इराण युद्ध, युक्रेन संकट आणि जागतिक क्रुड ऑईल मार्केट यासारख्या सध्याच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा झाली. या दोघांनी युक्रेन संघर्ष थांबवणे आणि इराण युद्धाबाबत उपाय शोधणे यावर जोर दिला आहे.

इराण संघर्षावर भर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांच्याशी सोमवारी (९ मार्च) फोनवरून चर्चा केली. ही चर्चा जवळपास १ तास सुरू होती. या चर्चेदरम्यान, इराण युद्ध, युक्रेनचा लष्करी संघर्ष आणि सध्या जगासमोर उभं असलेलं तेल संकट याबाबत सविस्तर चर्चा झाली.

ट्रम्प यांनी पुतीन यांच्यासोबत चांगलं संभाषण झाल्याचा दावा केला. त्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यात खूप मोठी दुष्मनी आहे. त्यामुळं ते यावर तडजोड करण्यास तयार नसतात. ट्रम्प यांनी याबाबत पुतीन यांच्यासोबत सकात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं.

क्रेमलीनचे परराष्ट्र धोरण सहाय्यक युरू उशाकोव्ह यांनी पुतीन आणि ट्रम्प यांच्यातील चर्चा ही जवळपास एक तास चालल्याचं सांगत याबाबत माहिती दिली. त्यांनी पुतीन यांनी इराण युद्ध संपवण्याबाबत ट्रम्प यांच्यासमोर त्यांचे विचार ठेवले. पुतीन यांनी आखाती देशांचे प्रमुख आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पजेशकियन यांच्याशी नुकत्याच केलेल्या बोलणीनंतर ट्रम्प यांच्यासमोर पुतीन यांनी हा प्रस्ताव ठेवल्याचं युरी यांनी सांगितलं.

उशाकोव्ह यांनी ट्रम्प आणि पुतीन यांच्यात चांगली चर्चा झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, पुतीन यांनी सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थीतीशी सलग्नित अनेक मुद्द्यांवर महत्वाची चर्चा केली. इराण संघर्ष आणि युक्रेन वादावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेसोबतच्या भागीदारीसह त्रिपक्षीय चर्चेवर जोर देण्यात आला.

युक्रेन संघर्ष संपण्याची शक्यता

इराणसोबतच दोन्ही नेत्यांनी युक्रेन मुद्द्यावर देखील गहन चर्चा केली. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युक्रेनमध्ये लवकरात लवकर सीजफायर व्हावी यासाठी चर्चा केली. क्रेमलिनने ट्रम्प आणि त्यांच्या टीमची मध्यस्थाच्या भूमिकेचे कौतुक केलं. असं उशाकोव्ह यांनी सांगितलं.

दोन्ही राष्ट्रपतींनी व्हेनेजुएला मुद्द्यावर देखील चर्चा केली. उशाकोव्ह यांनी सांगितलं की ट्रम्प आणि पुतीन यांनी जागतिक तेल बाजारच्या सध्याच्या स्थितीबाबत चर्चा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT