'हिम्मत असेल तर येथून तेल टँकर काढून दाखवा’, Donald Trump यांना इराणचे खुले आव्हान

जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतुकीच्या मार्गावर वाढलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात चिंता वाढली आहे.
strait of hormuz iran challenge donald trump america
'हिम्मत असेल तर येथून तेल टँकर काढून दाखवा’, Donald Trump यांना इराणचे खुले आव्हानfile photo
Published on
Updated on

strait of hormuz iran challenge donald trump america

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) मुद्द्यावर इराणने अमेरिका आणि इस्रायलला खुले आव्हान दिले आहे. इराणी लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यात जर खरोखर धाडस असेल, तर त्यांनी अमेरिकन युद्धनौकांच्या सुरक्षेतून तेल टँकर्सना या मार्गाने सुरक्षितपणे बाहेर काढून दाखवावे. जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतुकीच्या मार्गावर वाढलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात चिंता वाढली आहे.

strait of hormuz iran challenge donald trump america
मध्यपूर्वेत युद्धाची धग; भारत अलर्ट मोडमध्ये, LPG पुरवठ्यावर घेतला मोठा निर्णय

होर्मुझ सामुद्रधुनीबाबत इराणने अमेरिका आणि इस्रायलला नव्याने इशारा दिला आहे. यात ट्रम्प यांना थेट आव्हान देत तेल टँकर्सची सुरक्षा करून दाखवण्याचे सांगितले आहे.

खरं तर होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक तेल व्यापारातील सर्वात महत्त्वाचा मार्ग मानला जातो. युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने इशारा दिला होता की, जर त्याच्या हितांना धक्का बसला तर तो होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांना रोखू शकतो. त्यानंतर शेकडो जहाजे होर्मुझ परिसरात अडकली असून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरही त्याचा परिणाम झाला आहे.

strait of hormuz iran challenge donald trump america
LPG price hike: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा चटका! घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर भडकले, आजपासून नवीन दर लागू

दरम्यान, इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने स्पष्ट केले की इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केलेली नाही. मात्र इस्रायल आणि अमेरिकेशी संबंधित जहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच Islamic Revolutionary Guard Corps (इराण रिव्होल्यूशनरी गार्ड्स)च्या प्रवक्त्याने म्हटले आहे, “आम्ही ट्रम्प यांना आव्हान देतो की त्यांनी होर्मुझमधून तेल टँकर्स बाहेर काढण्यासाठी अमेरिकन युद्धनौकांची सुरक्षा व्यवस्था करून दाखवावी.”

अमेरिकेचे अर्थमंत्री Scott Bessent यांनीही होर्मुझबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्या मार्गाने जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे आणि यावर लवकरच तोडगा काढला जाईल.

होर्मुझ सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का?

होर्मुझ सामुद्रधुनी हा अरुंद समुद्री मार्ग Persian Gulf ला Gulf of Oman आणि पुढे Arabian Sea शी जोडतो. जगातील सुमारे २०% कच्चे तेल आणि जवळपास २५% नैसर्गिक वायू याच मार्गाने जगभर पाठवले जाते.

Saudi Arabia, Iraq, United Arab Emirates आणि Iran या देशांच्या ऊर्जा निर्यातीचा मोठा भाग या मार्गावर अवलंबून आहे. सध्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर येथे जहाजांची हालचाल जवळपास ठप्प झाली आहे.

इराणसाठी हा मार्ग केवळ आर्थिक जीवनरेखा नाही, तर नौदल शक्ती दाखवण्याचे महत्त्वाचे साधनही आहे. इराणने येथे किनारपट्टीवरील क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि वेगवान लहान नौका तैनात केल्या असून त्यामुळे या परिसरातील त्याची सागरी क्षमता अधिक मजबूत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news