China Mosquito Drone pudhari
आंतरराष्ट्रीय

China Mosquito Drone: चीनचा एक सा** 'मच्छर' भारताची डोकेदुखी वाढवणार... फक्त ०.३ ग्रॅम वजनाचा रडारला चकवा देणारा धोका

Anirudha Sankpal

China Mosquito Drone: जगभारत पारंपरिक युद्धापेक्षा ड्रोन किती उपयुक्त ठरतात हे आपल्याला युक्रेन आणि इराण युद्धाने दाखवून दिले आहे. आता चीनने देखील ड्रोनचा शस्त्र म्हणून वापर करण्यासाठी एक अजब शक्कल लढवली आहे. मात्र चीनच्या या नव्या शस्त्रामुळे जगभरात सुरक्षा आणि प्रायव्हसीबाबत चर्चा सुरू झाली आहे. चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी (NUDT) ने एक मायक्रो ड्रोन तयार केला आहे. याचा आकार आणि वजन अथ्यंत कमी असून तो डासांसारखा आहे.

कसे आहे ड्रोनचे डिझाईन?

चीनचा हा डासाच्या आकाराचा ड्रोन साधारण ड्रोन नाहीये. या प्रोटोटाईपचे वजन फक्त ०.३ ग्रॅम इतकं आहे. याचं डिझाईन असं आहे की ते एक उपकरण आहे हेच पहिल्या नजरेत कळत नाही. याचे पंख हे पानाच्या आकारासारखे आहेत. त्यामुळं याला एक नैसर्गिक रूप मिळतं. याची बवावट ही अत्यंत पातळ अशा स्वरूपाची आहे.

या छोट्या बॉडीमध्ये आत अत्याधुनिक आणि अत्यंत लहान सेंसर लावण्यात आले आहेत. ते गुप्तपणे फोटो घेणे, आवाज रेकॉर्ड करणे आणि डेटा गोळा करण्यासारखी कामे करतात.

रडारला चकवा

या ड्रोनची खास गोष्ट म्हणजे हे ड्रोन रडारवर दिसतच नाहीत. ते अत्यंत छोट्या आकाराचे असल्याने आणि खास मटेरिअलने तयार केल्यामुळं मिलिट्री ग्रेडच्या रडारवर देखील ते दिसत नाहीत. त्यामुळे ते कोणाच्याही घरात, सरकारी कार्यालय किंवा संवेदनशील इमारतीत खिडकी किंवा छोट्याशा होलमधून देखील घुसू शकतात. ते आत घुसलेत याचा पत्ता देखील लागत नाही.

मात्र काही त्रुटी देखील

जरी हा मच्छर ड्रोन फार फायदेशीर वाटला तरी त्याच्या काही त्रुटी देखील आहेत. जाणकारांच्या मते सध्याच्या घडीला याचा वापार एक मोठी समस्या आहे. याचा आकार कमी असल्यामुळं याला कमी बॅटरी लाईफ असते. तसेच हे डास ड्रोन फार कमी काळासाठी उड्डाण करू शकतात.

याचे वजन फक्त ०.३ ग्रॅम असल्यानं सोसाट्याच्या वाऱ्यात हे दुसरीकडे उडून जाऊ शकतात आणि आपला रस्ता भटकू शकतात.

चीनचा सोशलवर भौकाल

चीनने मच्छर ड्रोन तयार करताच सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे. लोकांना आपल्या प्रायव्हसीबाबत चिंता वाटू लागली आहे. भविष्यात कोणतीच जागा सुरक्षित नाहीये.

काही जणांनी आता कॉम्पुटर बग खरोखर किडे होऊन उडू लागले आहेत. आता हे डास ड्रोन मारण्यासाठी घरातील डास मारण्याची बॅट वापरण्याचा सल्ला देखील अनेकजण देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT