मेझॉन वेब सर्व्हिसेसचे (AWS) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मॅट गारमन यांनी एआयच्‍या वापराबाबत भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. Pudhari Image
आंतरराष्ट्रीय

AI vs Employees : AI कर्मचाऱ्यांची जागा घेणार का? AWS चे CEO मॅट गारमन यांनी दिले उत्तर

कर्मचाऱ्यांना आधीच माहिती असलेली कामे हाताळते जाते तेव्‍हा तंत्रज्ञान सर्वाधिक उपयुक्त ठरते

पुढारी वृत्तसेवा

AWS CEO Matt Garman AI Replacement : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) जगभरातील रोजगारांवर मोठा प्रभाव पडेल, यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सूरु आहे. अनेक कंपन्‍यांनी 'एआय'चा वापर वाढल्‍याने कर्मचार्‍यांच्‍या संख्‍येत कपातही केली आहे. यामुळेच 'एआय'मुळे बेरोजगारी वाढेल, अशी भीतीही व्‍यक्‍त होत आहे. आता अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे (AWS) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मॅट गारमन यांनी कामाच्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भूमिकेबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे.

कर्मचार्‍यांच्‍या कामाची गती वाढेल

लास वेगासमध्ये अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसच्‍या री:इन्व्हेंट परिषदेपूर्वी 'वायर्ड'ला दिलेल्या मुलाखतीत, गारमन म्‍हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा उत्पादकता साधने म्हणून सर्वोत्तम होत आहे. कर्मचाऱ्यांना आधीच माहित असलेली कामे हाताळताना तंत्रज्ञान मौल्यवान ठरते. यामुळे कामाचा वेगही वाढला आहे;पण मानवी निर्णयाची मूलभूतपणे जागा न घेता जलद काम करण्याची परवानगी मिळते. कर्मचाऱ्यांना आधीच माहिती असलेली कामे हाताळते जाते तेव्‍हा तंत्रज्ञान सर्वाधिक उपयुक्त ठरते. यामुळे कर्मचाऱ्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार न काढता, त्यांच्या कामाची गती वाढते.

एआय कर्मचार्‍याला पर्याय नाही मदतनीस

जेव्हा तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर कसा करायचा आहे याची माहिती असते तेव्‍हा ते खूपच प्रभावी ठरते. त्‍यामुळे एआय हे कधीच कर्मचार्‍यांची जागा घेवू शकत नाही. ते कर्मचार्‍यांसाठी पर्याय ठरत नाही तर त्यांच्या कामात अधिक कार्यक्षम बनवण्याचा मार्ग आहे."

१८ महिन्‍यांचे काम केवळ ७१ दिवसांमध्‍ये

AWS च्या एका टीमने केवळ 71 दिवसांत, सहा कर्मचाऱ्यांच्या मदतीने एक अंतर्गत कोडबेस पुन्हा लिहिला. याच कामासाठी मूळतः 30 कर्मचाऱ्यांनी 18 महिने लागले असते. अ‍ॅमेझॉन AI च्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करत असताना हे परिणाम समोर येत आहेत. त्यांनी गेल्या एका वर्षातच 3.8 गिगावॉट (gigawatts) क्षमतेची भर घातली आहे. कंपनीने नुकतीच अमेरिकेतील सरकारी ग्राहकांना सेवा देण्यासाठी AI डेटा सेंटर्समध्ये $50 अब्ज (सुमारे 4.1 लाख कोटी रुपये) पर्यंतची नियोजित गुंतवणूक जाहीर केली आहे.

ॲमेझॉनने ऑक्‍टोबरमध्‍ये केली होती १४ हजार कर्मचार्‍यांची कपात

गारमन यांचे हे स्पष्टीकरण आणि अ‍ॅमेझॉनच्या अलीकडील कर्मचारी कपातीमुळे थोडी विसंगती निर्माण झाली आहे. कंपनीने ऑक्टोबरमध्ये सुमारे 14,000 कॉर्पोरेट पदे कमी केली होती. ही संख्‍या कंपनीच्‍या एकूण कर्मचाऱ्यांपैकी चार टक्‍के आहे. 'रॉयटर्स'च्या अहवालानुसार, ही एकूण कपात 30,000 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अ‍ॅमेझॉनच्या 'एचआर' (मानव संसाधन) विभागाने स्पष्टपणे AI चा उल्लेख "इंटरनेटनंतर पाहिलेले सर्वात परिवर्तनकारी तंत्रज्ञान" म्हणून केला होता.

1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या AI धोरणाला दिले आव्हान

मागील आठवड्यात अ‍ॅमेझॉन कंपनीच्‍या 1,000 हून अधिक र्मचाऱ्यांनी एका खुल्या पत्रावर स्वाक्षरी केली. यात त्यांनी कंपनीच्या "आक्रमक" AI अंमलबजावणीमुळे लोकशाही, रोजगार आणि हवामान उद्दिष्टांना धोका असल्याचे म्हटले आहे. या याचिकेत नमूद केले आहे की, कंपनीने 2040 पर्यंत 'नेट-झिरो' (Net-Zero - कार्बन उत्सर्जन शून्य) करण्याचे वचन दिले असले तरी, 2019 पासून अ‍ॅमेझॉनचे कार्बन उत्सर्जन वाढले आहे. यासाठी AI पायाभूत सुविधांच्या पर्यावरणीय खर्चाकडे त्यांनी लक्ष वेधले. तर कंपनीने हवामानविषयक आश्वासनांपासून माघार घेतल्याचा दावा फेटाळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT