पुढारी ऑनलाईन डेस्क : उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या ड्रेसिंग स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. आज तिला कोण ओळखत नाही? अभिनयापेक्षा उर्फीने तिच्या फॅशन सेन्समुळे खूप लोकप्रियता मिळवली आहे. तिचा विचित्र फॅशन सेन्स तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. तर बरेच लोक आहेत ज्यांना उर्फीची फॅशन अजिबात आवडत नाही. पण, आता उर्फीची (Urfi Javed) फॅशन ही आंतरराष्ट्रीय डिझायनरला फारचं आवडलीय. ही फॅशन डिझायनरने उर्फीचं काय कौतुक केलंय पाहुया. उर्फीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
उर्फी तिच्या फॅशनमुळे दररोज ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. नेटकरी तिच्या ड्रेसिंग स्टाईलवर जोरदार टीका करतात. तरी उर्फीला या टीकेमुळे काही फरक पडत नाही. काहीवेळा ती या ट्रोलर्सना सडेतोड उत्तरदेखील देते. उर्फीची फॅशन फक्त भारतातच नाही तर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. होय, खरे तर एका आंतरराष्ट्रीय डिझायनरने उर्फीच्या ड्रेसिंग स्टाईलचे कौतुक केले आहे.
उर्फीने ब्रिटीश-अमेरिकन फॅशन डिझायनर हॅरिस रीड (Harris Reed) यांच्या डिझाईनपासून प्रेरणा घेऊन एक पोशाख डिझाईन केला आहे. तिचा हा ड्रेस परिधान करून ती खूप लाईमलाईटमध्येही आलीय. हॅरिसची नजर उर्फीवर पडली तेव्हा तो तिचे कौतुक करताना राहू शकला नाही.
उर्फीचे कौतुक करताना, आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर हॅरिस रीडने इंस्टाग्राम स्टोरीवर उर्फी जावेदसाठी एक पोस्ट शेअर केली आणि असेही सांगितले की त्याला उर्फीचे वेड आहे. आंतरराष्ट्रीय डिझायनरकडून कौतुक मिळाल्यानंतर उर्फीनेही यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आनंद व्यक्त केला.
हेदेखील वाचा-