IndiGo 
Latest

Indigo Airlines : ‘इंडिगो’चे विमान भरकटलं, पाकिस्तानात पोहोचलं!

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमृतसरहून अहमदाबादला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे (Indigo Airlines) विमान खराब हवामानामुळे पाकिस्तानातील लाहोरला पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

खराब हवामानामुळे विमान भरकटले

डॉन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ११) सायंकाळी ७.३० वाजता खराब हवामानामुळे  भारतीय हवाई हद्दीत परत येण्यापूर्वी इंडिगो एअरलाइन्सचे विमान  लाहोरमध्ये दाखल झाले. त्यानंतर ते रात्री ८.०१ वाजताच्या सुमारास भारतात परतले. या प्रकरणी विमान कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या (Civil Aviation Authority -CAA) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही नवीन गोष्ट नाही कारण खराब हवामानात आंतरराष्ट्रीय स्तरावर याला परवानगी आहे.  मे महिन्यात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) चे विमान खराब हवामानामुळे भारतीय हवाई हद्दीत घुसले आणि जवळपास १० मिनिटे ते इथेच अडकले होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT