ICC Tournament’s : अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया ठरला पहिला संघ | पुढारी

ICC Tournament's : अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया ठरला पहिला संघ

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताला पराभूत करत ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी धुव्वा उडवला. त्यामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चॅम्पियन बनला आहे. टी 20, वन डे आणि कसोटी क्रिेकेटमधील वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर केले आहेत. अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला आहे. (ICC Tournament’s)

ऑस्ट्रेलियाने सर्व फॉरमॅटमध्ये ट्रॉफी जिंकली (ICC Tournament’s)

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून ऑस्ट्रेलियाने इतिहास रचला. आयसीसीचे सर्व फॉरमॅट जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने 6 वेळा एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे. 2006 आणि 2009 मध्ये दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. 2021 मध्ये T20 विश्वचषक जिंकला आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गदाही जिंकली आहे. (ICC Tournament’s)

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. स्मिथ (121) आणि ट्रॅव्हिस हेड (163) यांनी शतके झळकावली. भारताकडून सिराजने चार विकेट घेतल्या. भारताने पहिल्या सामन्यात 296 धावा केल्या होत्या. रहाणेने 89 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी शार्दुल ठाकूरने 51 धावा केल्या. पॅट कमिन्सने तीन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 173 धावांची आघाडी मिळाली. (ICC Tournament’s)

ऑस्टेलियाचे पहिल्या दिवसापासून वर्चस्व

ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमावून 270 धावा करून दुसरा डाव घोषित केला. अॅलेक्स कॅरीने नाबाद 66 धावा केल्या. लबुशेन आणि स्टॉर्क यांनी 41-41 धावांची खेळी केली. जडेजाने तीन विकेट घेतल्या. भारत दुसऱ्या डावात सर्वबाद 234 धावांवर आटोपला. कोहलीने 49 आणि रहाणेने 46 धावा केल्या. रोहित शर्माने 43 धावा केल्या. नॅथन लायनने चार आणि स्कॉट बोलँडने तीन विकेट घेतल्या. (ICC Tournament’s)

हेही वाचलंत का?

Back to top button