कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
गेले काही दिवस कोल्हापूर शहर व परिसरातील ग्रामीण भागात भटकंती करणाऱ्या गव्याचे (indian gaur) बुधवारी पहाटेपासून कसबा बावडा, कदमवाडी परिसरात अनेक नागरिकांना दर्शन झाले. कसबा बावड्यापासून राष्ट्रीय महामार्गावरील पुलापर्यंतच्या पंचगंगा नदी परिसरातील शेतीत गवा फिरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मध्यरात्री अडीचच्या सुमारास शिये पुलाच्या आसपास शेतवाडीमध्ये गव्याची चाहुल लागली. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी याबाबत सतर्क राहावे. खात्री करून मगच शेतामध्ये किंवा त्या मार्गी प्रवास करावा. कसबा बावड्यातील उत्तर भागातील शेतकऱ्यांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी. आपापल्या नातेवाईक मित्रमंडळी यांचेशी संपर्कात रहावे करावे. हा गवा या भागात असण्याची दाट शक्यता आहे.
आज सकाळी सहाच्या दरम्यान झूम प्रकल्प कदमांचा घाणा याठिकाणी गवा दिसला. रस्यावर कुत्रीदेखील जास्त होती. तोपर्यंत गवा शेतामध्ये गेला. देवर्डे मळा, कदमवाडी, भोसलेवाडी शेतामध्ये असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच कोणताही दंगा करू नये. दिसल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचलं का?