IND vs SA : द. आफिकेत विराट-राहुल द्रविडची 'मस्ती की पाठशाला' (Video) 
Latest

Virat Kohli-Rahul Dravid : द. आफ्रिकेत विराट-राहुल द्रविडची ‘मस्ती की पाठशाला’ (Video)

रणजित गायकवाड

जोहन्सबर्ग, पुढारी ऑनलाईन : दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA) पोहोचल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने तयारी सुरू केली आहे. या दौ-यात टीम इंडिया ३ सामन्यांची कसोटी मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. दरम्यान, कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे. ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाच्या पहिल्या सराव सत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कसोटी कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Virat Kohli-Rahul Dravid) संघासोबत फुटबॉल खेळताना दिसत आहेत.

द. आफिकेत विराट-राहुल द्रविडची मस्ती की पाठशाला

२६ डिसेंबरपासून पहिला कसोटी सामना सुरू होणार असून विराटसेना प्रतिस्पर्धी द. आफ्रिका (IND vs SA) संघाला भीडण्यासाठी सज्ज झाली आहे. कसोटी मालिकेनंतर उभय संघांमध्ये १९, २१, २३ जानेवारीला वनडे सामने खेळवले जाणार आहेत. टीम इंडियाने कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीचा सराव सुरू केला आहे. द. आफ्रिकेत एक दिवसाचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर भारतीय संघाला पहिल्या सराव सत्रात सहभागी व्हावे लागेल. त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी रिचार्ज होण्यासाठी जोहान्सबर्गमध्ये जनरल प्रॅक्टीस सेशन पूर्ण केले. (Virat Kohli-Rahul Dravid)

कर्णधार विराट कोहली आणि कोच द्रविड यांच्यात रंगला सामना (Virat Kohli-Rahul Dravid)

सराव सत्रात संघ बराच वेळ फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळला. खेळादरम्यान द्रविड आणि कोहली अनेक वेळा एकमेकांशी हस्तांदोलन करताना आणि विनोद करताना दिसले. इतकंच नाही तर द्रविड आणि विराटच्या टीममध्ये सामनाही झाला होता. बीसीसीआय आणि कोहली यांच्यात सुरू असलेल्या वादात सराव सत्रात कोहली गमतीदार अॅक्शन करताना दिसला. त्याने जोरदार सराव केला आणि प्रशिक्षक द्रविडसोबत खूप मजामस्ती केली. (IND vs SA)

BCCI ने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये टीमचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच सोहम देसाई म्हणाले, आम्ही मुंबईत ३ दिवस कडक क्वारंटाईनमध्ये होतो. १० तासांच्या प्रदीर्घ उड्डाणानंतर आम्ही येथे पोहोचलो आणि एक दिवस पुन्हा क्वारंटाईनमध्ये राहिलो. सध्या खेळाडूंनी धावण्याबरोबरच फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला. येत्या काही दिवसांत सराव सत्र सुरू होईल. यामुळे खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.

सेंच्युरियन येथे २६ डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्या सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाने मजेशीर सत्राचा आनंद लुटला. संघातील सर्व खेळाडूंनी प्रशिक्षक राहुल द्रविडसह हलक्याफुलक्या हालचाली करून घाम गाळला. भारतीय क्रिकेट संघाच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांच्यासह टीम इंडियाचे सदस्य फुटबॉल खेळताना दिसले. Virat Kohli-Rahul Dravid (IND vs SA)

याआधी काय घडलं?

दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दौऱ्यापूर्वी बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने रोहित शर्माची वनडे आणि टी-२० संघांच्या कर्णधारपदी नियुक्ती जाहीर केली. आता विराट केवळ कसोटी संघाचा कर्णधार असेल. तथापि, वनडे संघाच्या कर्णधारपदी रोहितची नियुक्ती झाल्यानंतर, आणि आपले एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतल्याने कोहली संतापल्याचे म्हटले जात आहे. एकदिवसीय मालिकेसाठी तो विश्रांती घेणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण त्यानंतर स्वत: कोहलीने पत्रकार परिषद घेवून मी वनडे खेळणार असल्याचे जाहीर केले होते. आणि माझ्या बाबत अफवा पसरवल्या जात आहेत. असे म्हटले होते. तर रोहितशी माझा कसलाही वाद नसल्याचेहे त्याने स्पष्ट केले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेला पोहोचल्यानंतर विराट कोहली ज्या प्रकारे सहकाऱ्यांसोबत मस्ती करताना दिसला, त्यावरून संघात सध्या सर्व काही ठीक असल्याचे स्पष्ट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT