पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारतावर एक गडी राखून विजय मिळवला. बांगलादेशच्या अखेरीच्या जोडीने तब्बल ५१ धावांची भागीदारी करत भारताचा विजयाचा घास हिरावला. सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय बांगलादेशने घेतला होता. यांनंतर फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव १८६ गुंडाळला. भारताच्या वतीने सर्वाधिक ७३ धावा के. एल. राहूनने केल्या. (IND vs BAN 1st ODI)
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही. शिखर धवनच्या रूपात भारताला २३ धावांवर पहिला धक्का बसला. त्याने १७ चेंडूत ८ धावा केल्या. यानंतर कर्णधार रोहित शर्माही खास कामगिरी न करता तंबूत परतला. तो २७ धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर मैदानात उतरलेला भारताचा रनमशिन कोहलीही स्वस्तात माघारी फिरला. तो अवघ्या ९ धावा करून बाद झाला. सामन्यात धावगती सुधारण्याठी भारतीय संघ झुंज देत होता. यानंतर मध्यम फळीतील खेळाडू श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी भारताची डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संघाची धावसंख्या ९२ धावांपर्यंत पोहचवली. त्यांनंतर श्रेयस अय्यरही २४ धावा करून बाद झाला. (IND vs BAN 1st ODI)
सामन्यात पाचव्या विकेटसाठी लोकेश राहुलने आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ६० धावांची भागीदारी केली. यामुळे भारतीय संघाने १५० धावांचा टप्पा पार केला. यानंतर सुंदरही १९ धावा करून बाद झाला. सुंदर बाद झाल्यानंतर भारताला सलग धक्के बसू लागले. शाहबाज अहमद आणि दीपक चहर ० धावांवर बाद झाले. तर, शार्दुल ठाकूर दोन आणि मोहम्मद सिराजने नऊ धावा करून तंबूत परतले कुलदीप सेन दोन धावा करून नाबाद राहिला. केएल राहुल याने दमदार ७३ धावांची खेळी केली. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने पाच आणि इबादत हसनने चार विकेट घेतल्या. मेहदी हसन मिराजला एक विकेट मिळाली.
एकेकाळी सामन्यावर भारतीय संघाची पकड मजबूत स्थितीत होती. भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत बांगलादेशचे १३६ धावांवर ९ गडी बाद केले होते. मात्र, यानंतर भारतीय संघाने मैदानावर मोठ्या चुका केल्या या चुकांमुळे सामना भारतीय संघाच्या हातातून निसट गेला. सामन्याच्या अंतिम क्षणी विकेटकीपर के. एल. राहुलने मिराजचा सोपा झेल सोडला. त्यामुळे मेहदी हसन मिराज आणि मुस्तफिझूर रहमान यांनी शेवटच्या विकेटसाठी अर्धशतकी धावांची भागीदारी केली.
मिराज बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने एकट्याने विजयाला खेचून आणले. त्याने ३९ चेंडूत ४१ धावा करून नाबाद राहिला. त्याचवेळी मुस्तफिझूर ९ धावा करून नाबाद राहिला. या विजयासह बांगलादेशने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा;