Latest

अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद : लासलगाव येथे विटांनी भरलेला ट्रॅक्टर पलटी (video)

अनुराधा कोरवी

लासलगाव; पुढारी वृत्तसेवा : लासलगाव विंचूर रस्त्यावर आधीच्या अपघातग्रस्त ट्रकला ओव्हरटेक करून टँकरने विटाने भरलेल्या ट्रॅक्टरला कट मारला. याच दरम्यान विटांनी भरलेला ट्रॅक्टरवरील चालकांचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टरची टॉली पलटी झाली. या अपघातात टॉलीवर बसलेले चार- पाच मजूर जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, लासलगाव विंचूर रस्त्यावरील ॲक्सिस बँकेसमोर ट्रक आणि मोटरसायकलचा अपघात मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला होता. या अपघातात एक मोटरसायकल स्वार जागीच ठार झाल्याने घटनेतील अपघातग्रस्त ट्रक हा रस्त्याच्या कडेला उभा होता.

याच दरम्यान बुधवारी (दि. १५) रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाणाऱ्या एका टँकरने विटाने भरलेल्या ट्रॅक्टरला कट मारला. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवरील चालकाने अचानक ब्रेक मारल्याने विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या ट्रॉलीवर बसलेले चार ते पाच मजूर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

ही घटना जवळच असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद) झाली आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण हा अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी रस्त्याच्या कडेवरून हलवणे गरजेचे होते. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. यात कोणाचा जीव गेला असता तर त्याची जबाबदारी लासलगाव पोलिसांनी घेतली असती का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

हेही वाचलंत का? 

पहा व्हिडिओ : अपघाताचा थरार! लासलगावात विटांनी भरलेला ट्रॅक्टर पलटी; चार- पाच मजूर जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT