Latest

इम्रान खान यांच्‍या एक्‍स पत्नीने केला तिसरा विवाह!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची घटस्‍फोटीत पत्‍नी रेहम खान यांनी तिसर्‍यांदा
लग्‍नगाठ बांधली आहे. ४९ वर्षीय रेहम खान यांनी अमेरिकेमधील पाकिस्‍तानी अभिनेता मिर्झा बिलाल याच्‍याशी विवाह केला आहे.

'अखेर मला एक विश्‍वासू माणूस मिळाला', असे ट्विट करत रेहम खान यांनी आपल्‍या तिसर्‍या विवाहाची माहिती दिली. तसेच बिलालसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. अमेरिकेतील सिएटल शहरात एका घरगुती कार्यक्रमात दोघे विवाहबंधनात अडकले.

दोघांचेही तिसरे लग्‍न

रेहम खान व मिर्झा बिलाल या दोघांचेही हे तिसरे लग्‍न आहे. १९९३ मध्‍ये रेहमचे पहिले लग्न मानसोपचारतज्ज्ञ इजाज रहमान यांच्याशी झाले होते. २००५ मध्‍ये त्‍यांचा घटस्‍फोट झाला. यानंतर रेहम यांनी २०१४ मध्‍ये इम्रान खान यांच्‍याबरोबर विवाह केला. हे लग्‍न केवळ १० महिने टिकले. २०१५ मध्‍ये दोघांचा घटस्‍फोट झाला होता. यानंतर इम्रान खान यांनी बुशरा बीबीसोबत तिसरे लग्न केले होते.

कोण आहेत रेहम खान ?

रेहम खान यांनी पाकिस्तानमध्ये शिक्षण घेतले. यानंतर इंग्‍लंडमधील वृत्तवाहिनीमध्‍ये पत्रकार म्हणून काम केले. 2012 मध्ये त्‍या पाकिस्‍तानला परतल्‍या. स्थानिक टीव्ही शोसाठी मुलाखत घेत असताना त्यांची इम्रान खान यांच्‍याशी भेट झाली. दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी २०१४ मध्‍ये विवाह केला. मात्र ऑक्‍टोबर २०१५ मध्‍ये केवळ १० महिन्‍यामध्‍ये त्‍यांचा घटस्‍फोट झाला.

रेहम खान आत्‍मचरित्रामुळे उडाली होती खळबळ

रेहम खान यांनी २०१८ मध्ये 'रेहम खान' नावाने आपलं आत्मचरित्र प्रकाशित केले होते. यामध्‍ये इम्रान खान यांच्‍य खासगी आयुष्‍याविषयी अनेक गौप्‍यस्‍फोट करण्‍यात आले होते. राजकीय फायद्यासाठी इम्रान खान यांनी महिलांचा वापर केला आहे. इम्रान खान अंमली पदार्थांचे सेवन करतात, तसेच महिलांचे लैंगिक छळ करतात, असा आरोपही त्‍यांनी आत्‍मचरित्रातून केला होता. या आरोपावर इम्रान खान यांनी मौन बाळगले. राजकीय फायद्‍यासाठी सर्व आरोप करण्‍यात आल्‍याचा दावा त्‍यांनी केला होता.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT