nusarat jahan and nikhil jain  
Latest

मी बायसेक्शुअल नाहीये, अजूनही नुसरतवर माझं प्रेम : निखिल जैन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन :

मध्यंतरी घटस्फोटांमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री नुसरत जहाँचा पती निखिल जैन याने एक मोठा खुलासा केलाय. तृणमूल काँग्रेसची लोकसभा खासदार नुसरत जहाँ ही पती निखिल जैन याच्यापासून विभक्त झाली. पण, त्यानंतर अनेक फोटोंमधून ती अभिनेता यश दासगुप्तासोबत दिसतेय. कधी दासगुरप्तासोबत अफेअर तर बाळाचा जन्म अशा अनेक कारणांमुळे ती चर्चेत राहिलीय. आता इतक्या दिवसांनंतर जैनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो जहाँसोबत असलेल्या नात्याबाबत पहिल्यांदाच उघडपणे बोललाय.

तो एक बिझनेसमॅन आहे. एका विशेष मुलाखतीत त्याने त्याच्या आणि नुसरत जहाँच्या नात्याविषयी उघडपणे सांगितलं आहे. तो म्हणतो, तो अजूनही त्याची पूर्वाश्रमिची पत्नी जहांच्या प्रेमात आहे.

वाद झाल्यानंतर ती आणि जैन वेगळे झाले होते. त्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. त्यावेळीही त्याने हे माझे बाळ नसल्याचे म्हटले होते. पण, तेव्हापासून दासगुप्ता हा जहांसोबत नेहमी दिसायचा.

जैनपासून वेगळं झाल्यानंतर तिने अनेक आरोप केले होते. यामध्ये तो बायसेक्शुअल असल्याचाही आरोप तिने केला होता. या मुलाखतीत बोलताना जैनने तिचा हा आरोप फेटाळला.

जहाँने जैनशी जून २०१९ मध्ये लग्न केले होते. हे लग्न बोर्दम, तुर्की येथे मोठ्या धामधुमीत पार पडलं होतं. पण, एका वर्षातच दोघांमध्ये दुरावा आला. घटस्फोटवेळी ती म्हणाली, त्यांचं लग्न तुर्कस्तानमध्ये झालंय. विशेष विवाह कायद्यांतर्गत त्यांची नोंदणी भारतात झालेली नाही. त्यामुळे हा विवाह भारतात कायदेशीररित्या वैध नाही.

पुढे जहां अभिनेता यश दासगुप्तासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्याचे समोर आले. जैनने ऑगस्ट महिन्यात बाळाला जन्म दिल्यानंतर पालकत्व स्वीकारण्यासाठी दासगुप्ता पुढे आला. मुलाचे वडील म्हणून यश दासगुप्ताने आपले नाव नोंदवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT