Hyundai Grand i10 Nios 
Latest

Hyundai Grand i10 Nios ची नवी कॉर्पोरेट एडिशन आहे खास, ‘अशी’ आहे किंमत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

ह्युंदाईची I10 NIOS ही भारतातील एक प्रसिद्ध अशी कार आहे. (Hyundai Grand i10 Nios) चांगले फिचर्स, दिसायला सुंदर, अगदी आरामदायी आणि परवडणारी किंमत अशी ही कार अनेकांच्या पंसतीस उतरली आहे. या कारची आता कॉर्पोरेट एडिशन लाँच झालेली आहे. 1.2 पेट्रोल MT आणि 1.2 पेट्रोल AMT अशा दोन प्रकारात ही कॉर्पोरेट एडिशनची कार ग्राहकांना मिळणार आहे. (Hyundai Grand i10 Nios)

I 10 च्या मॅग्ना आणि स्पोर्टस ट्रीम यांच्या मधली कार म्हणजे कॉर्पोरेट एडिशन असणार आहे. ६.७५ इंचचे टचस्क्रीन आणि इलेक्ट्रीक फोल्डिंग ORVM, टर्न इंडिकेटर अशी फिचर्स या कारमध्ये देण्यात आली आहेत.

या कारच्या बाह्यरूपात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. व्हिल हे गनमेटल फिनिशचे आहेत, रिअर क्रोम गार्निश, ग्लॉस ब्लॅक रॅडिएटर ग्रील यामुळे कारचा लूक फारच सुंदर झालेला आहे.

इंटिरिअर काळ्या आणि लाल रंगात आहेत. या कारचा टॉर्क ११४NM, तर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे.

ह्युंदाईचे संचालक तरुण गर्ग म्हणाले, "या कारला सुरुवातीपासूनच फार चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच कॉर्पोरेट एडिशन लाँच करण्यात आली आहे. तरुणांना ही कार आकर्षित करेल असा आमचा विश्वास आहे. तंत्रज्ञान आणि देखणेपणा या दोन्हींचा संगम या कारमध्ये आहे." या कारची किंमत १.२ petrol MT – Rs ६,२८,९०० तर १.२ petrol AMT – Rs ६,९७,७०० इतकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT