मोबाईलचा पासवर्ड काढून मागितला म्हणून पत्नीच्या डोक्यात ईस्त्री घालून तिला गंभीर जखमी केल्याचा प्रकार इस्लामपूर येथील टकलाईनगरमध्ये बुधवारी घडला. मारहाणीत पूजा सतिश सूर्यवंशी (वय २८, रा. टकलाईनगर) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
याप्रकरणी पूजा यांनी पती सतिश यांच्याविरोधात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवारी सतिश व पूजा हे घरी होते. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास पूजा यांनी मुलीची शाळा सुरू झाली का नाही ? हे पाहण्यासाठी सतिशला मोबाईलचा पासवर्ड काढून मोबाईल मागितला.
त्यावेळी रागावलेल्या सतिशने मोबाईल फेकून दिला. पूजाने याबाबत विचारले असता सतिशने शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तेथील ईस्त्री उचलून पूजा यांच्या डोक्यात घातली. पूजा या गंभीर जखमी झाल्या. शेजारच्या लोकांनी पूजा यांना सतिशच्या तावडीतून सोडविले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचलं का?