४१७ मतदार ठरवणार कोल्हापूर विधान परिषदेचा आमदार | पुढारी

४१७ मतदार ठरवणार कोल्हापूर विधान परिषदेचा आमदार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर विधान परिषद यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या डिसेंबरमध्ये होणार्‍या निवडणुकीत जिल्ह्यातील 417 मतदार विधान परिषदेचा आमदार ठरविणार आहेत. निवडणुकीसाठी मतदारांची संख्या निश्‍चित करण्यात आली. गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत 35 मतांची वाढ झाली आहे. सन 2015 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत 382 मतदार होते.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवरदेखील जोरात तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी मतदार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे नगरसेवक आणि पंचायत समितीच्या सभापतींचा समावेश असतो.

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक : शौमिका महाडिक की राहुल आवाडे

महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत नोव्हेंबरमध्ये संपली आहे. महापालिकेची मुदत संपली तेव्हा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे या मुदतीतील सर्वच महानगर पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामध्ये कोल्हापूर महापालिकेचाही समावेश आहे. अद्याप महानगर पालिकेची निवडणूक झालेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या 81 नगरसेवकांना यावेळी मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहण्याची नगरसेविकांची पहिलीच वेळ आहे.

कोल्हापूर विधान परिषद मतदारांची संख्या वाढली

गेल्या निवडणुकीत कोल्हापूर महानगर पालिकेसह इचलकरंजी, पेठवडगाव, गडहिंग्लज, मलकापूर, कुरूंदवाड, मुरगूड, पन्हाळा, जयसिंगपूर आणि कागल या नगपालिकेचे नगरसेवक मतदार होते. राज्यात महायुतीचे सरकार असताना जिल्ह्यात शिरोळ, हुपरी, हातकणंगले, आजरा व चंदगड या चार नगरपालिका, नगरपंचायती नव्याने स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे यावर्षी मतदारांची संख्या वाढली आहे.

कोल्हापूर : जिल्हा बँक आणि विधान परिषद कनेक्शन!

कोल्हापूर विधान परिषद : पाच मतदारांचा मृत्यू

यावर्षी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 417 मतदार असणार आहेत. त्यामध्ये नगरपालिका व नगरपंचायतीचे 339 नगरसेवक, जिल्हा परिषदेचे 66 सदस्य व पंचायत समितीचे 12 सभापती यांचा समावेश आहे. 4 नगरसेवक व 1 जिल्हा परिषद सदस्य अशा पाच मतदारांचा मृत्यू झाला आहे.

पाहा व्हिडिओ…

Back to top button