तुम्ही वापरत असलेल्या ब्लूटूथचे नाव 'Bluetooth' कसे पडले? 
Latest

तुम्ही वापरत असलेल्या ‘ब्लू टूथ’चे नाव ‘Bluetooth’ कसे पडले?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मोबाईल फाेन आपल्‍या जगण्‍यातला अविभाज्‍य भाग झाला आहे. माेबाईल फाेन म्‍हटलं की,  'ब्लू टूथ' आलच. तसेच मागील काही वर्षांपासून 'ब्लू टूथ; हेडफोनही आले आहेत. कोणत्याही मोबाईलवरुन एखादा डाटा घ्यायचा असेल तर ते ब्लू टूथ वरुन घेता येताे; पण तुम्हाला माहिती आहे का? Bluetooth ज्याचा मराठी अर्थ 'निळा दात' असा होतो. हे नाव आलं तरी कुठून. चला तर, जाणून घेवूया Bluetooth च्या नावामागीलगोष्ट.

Bluetooth नाव कसं पडलं?

'ब्लू टूथ' नावा पाठिमागे कोणतीही टेक्नॉलॉजी दडलेली नाही. तुम्हाला पटणार नाही; पण Bluetooth हे नाव एका राजाचे होते. यावरुन हे नाव ठेवण्‍यात आले आहे. राजाचे नाव हेराल्ड गोर्मसन होते. या राजाने ९५७ ते ९८६ पर्यंत नॉर्वे आणि डेन्मार्कवर राज्य केले. Bluetooth हे नाव निळ्या दाताशी देखील संबंधित असल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे.

ब्लू टूथच्या वेबसाइटवर या राजाचा उल्लेख आहे. जो मध्ययुगीन स्कॅन्डिनेव्हियन राजा होता. डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडन या देशांच्या राजांना स्कॅन्डिनेव्हियन राजा म्हटलं  जात असे.  त्‍याच असं झालं की, या राजाकडे एक निळा दात होता, जो पूर्णपणे निरुपयोगी होता, म्हणून त्याला डॅनिश भाषेत Blátǫnn नाव देण्यात आले, ज्याचा इंग्रजी अर्थ ब्लू टूथ असा होतो, अशी माहिती अनेक अहवालातून समोर आली आहे.

ब्लू टूथचे नाव राजा हॅराल्ड गोर्मसन यांच्या नावावर ठेवण्यात आले होते, हे पूर्णपणे तथ्यात्मक आहे. कारण या राजाने डेन्मार्कचा पहिला पूल स्कॅन्डिनेव्हियन बांधला होता, जो ५ मीटर रुंद आणि ७६० मीटर लांब होता. त्यावेळी या पुलाचा प्रवासात खूप वापर केला जायचा. निळ्या दातांमुळे या राजाचे नाव ब्लू टूथ ठेवण्यात आले होते. हे लक्षात घेऊन त्यावेळी एरिक्सन कंपनीत रेडिओ सिस्टीम म्हणून काम करणारे ब्लू टूथचे मालक जाप हार्टसेन हे एरिक्सन तसेच नोकिया आणि इंटेल सारख्या कंपन्यांमध्ये काम करत होते. या कंपन्यांनी मिळून एक फॉर्मेशन तयार केले, ज्याला SIG (स्पेशल इंटरेस्ट ग्रुप) असे नाव देण्यात आले. या ग्रुप अंतर्गत या उपकरणाला ब्लू टूथ (Bluetooth) असे नाव देण्यात आले होते. तेव्‍हा पासून ब्लू टूथ हा शब्‍द प्रचलित झाला.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT