कनिका तिवारी : ‘अग्‍निपथ’मधील हृतिकची ही बहीण इतकी ग्लॅमरस - पुढारी

कनिका तिवारी : ‘अग्‍निपथ’मधील हृतिकची ही बहीण इतकी ग्लॅमरस

पुढारी ऑनलाईन

हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांच्या ‘अग्‍निपथ’मधील हृतिकच्या बहिणीची भूमिका केलेली मुलगी आठवतेय? तिच्यातील निरागसतेने तेव्हा प्रेक्षकांना आपलेसे केले होते. त्या मुलीचे नाव आहे कनिका तिवारी. या चित्रपटाला आता 10 वर्षे लोटली आहेत. कनिकाचे ट्रान्सफॉर्मेशन पाहिले तर ती एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही. कनिका अभिनयाच्या क्षेत्रात तेव्हापासून सक्रिय आहे. ‘अग्‍निपथ’ तिचा पहिला चित्रपट होता. सध्या कनिका तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे. ‘अग्‍निपथ’नंतर ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सक्रिय होती. कनिकाने तेलगू, तमीळ आणि कन्नड भाषांतील चित्रपटांत काम केले आहे.

सध्या ती दाक्षिणात्य चित्रपटांतील एक सुप्रसिद्ध चेहरा बनली आहे. लवकरच ती श्रेयस तळपदेसोबत ‘मन्नू और मुन्नी की शादी’मध्ये दिसणार आहे. कनिका सोशल मीडियात प्रचंड सक्रिय असते. तिच्या फॅन्ससाठी ती नेहमीच फोटो, व्हिडीओज शेअर करत असते. कनिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची बहीण आहे.

Back to top button