Latest

ये लाल रंग हमें मार डालेंगा ; ताराच्या लूकवर नेटकरी फिदा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारिया ( Tara Sutaria ) हिच्या आगामी 'हिरोपंती २' चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीस घेवून येत आहे. या चित्रपटाचा २. २० मिनिटांचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. याच दरम्यान तारा सुतारिया लाल रंगाच्या थ्री पीसमध्ये हटके फोटोशूट करून चर्चेत आली आहे.

अभिनेत्री तारा सुतारियाने ( Tara Sutaria ) लाल रंगाचा कोट, पॅन्ट आणि ब्रा (थ्री पीस) परिधान करून हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केलं आहेत. या फोटोत तारा खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. या फोटोतील खास म्हणजे, ताराने कोटाची बटणे उघडी ठेवत हॉट पोझ दिली आहे. परिधान केलेल्या ड्रेससोबत तिने लाल रंगाचे पायातील बूज आणि छोटी पर्स कॅरी केली आहे. याशिवाय तिने आपल्या डोळ्यावर सुंदर चष्मा घातला आहे. तिच्या मोकळ्या केसांसह मेकअपने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'अहमदाबाद?? #हिरोपंती२' असे लिहिले आहे. शेअर केलेल्या फोटोत एका फोटोत तिने पॅन्टच्या खिशात हात घालून हटके पोझ दिल्याचेही दिसत आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ताराच्या या फोटाला जवळपास ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

हे सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक स्टार्संनी भरभरून कौतुक करत कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. यात अभिनेता कौस्तुव घोषने 'Dayummm ?'. आणि निर्माता अहमद खानची पत्नी शायराने ताराच्या फोटोवर चार हार्ट ईमोजी शेअर करत कॉमेन्टस दिल्या आहेत. तर एका युजर्सने 'हा लाल रंग तुझ्यावर शोभत आहे. आता तू घातल्याने दुसऱ्या कुणावरही तो शोभणार नाही.❣️❣️', ये लाल रंग हमें मार डालेंगा ❤️, 'Heyyyy smokinn hotnesss T ???????????❤️❤️❤️❤️❤️???'. 'you are looking beautiful ?????', तर दुसऱ्या एका युजर्सने 'तू फक्त सौंदर्याचे प्रतीक आहेस????',
'Cute?', 'Omg???', 'Red Rose ??', 'Uuuuhhhhh??', 'Beautiful mam ?❤?♥???❤?♥???❤?♥??'. 'आगामी चित्रपटाची वाट पाहू शकत नाही.' असा अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

याशिवाय एका चाहत्याने तिला लहान आहेस का? असा प्रश्न देखील विचारला आहे. तर काही नेटकऱ्यांनी ताराच्या फोटोवर हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. याआधीही तारा आगामी 'हिरोपंती २' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने निळ्या रंगाच्या डेमिनमध्ये दिसली आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमधून 'हिरोपंती २' लवकरच येत असल्याचे सांगितले आहे. हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

सध्या ताराच्या 'हिरोपंती २' २. २० मिनिटांचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. या चित्रपटात टायगरने बबलूची तर अमृता सिंहने त्याच्या आईची भूमिका साकारली आहे. तसेच नवाजुद्दीन सिद्दीकीने खलनायकाच्या भूमिकेत (लैला पात्र) दिसला आहे. 'हिरोपंती २' हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT