पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील आठवड्यात मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावर ( Manipur violence ) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज ( दि. ८ )आपली प्रतिक्रिया दिली. 'इंडिया टूडे'शी बोलताना अमित शहा म्हणाले की, या प्रकरणी न्यायालयाने आदेश दिला आहे. मणिपूर सरकार मेईतेई समुदायाच्या अनुसूचित जमातीच्या दर्जाबाबत निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधितांशी चर्चा करेल.यानंतर मणिपूर सरकार योग्य निर्णय घेईल. कोणत्याही व्यक्ती किंवा गटाने घाबरण्याची गरज नाही,"
मणिपूर उच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या आदेशाला विरोध करण्यासाठी कुकी आदिवासी गटाने निषेध मोर्चा काढला होता. यावेळी बिगर -आदिवासी मेईतेई समुदायाशी संघर्ष झाल्यानंतर बुधवार, 3 मे रोजी मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळून आला होता. राज्य सरकारला बहुसंख्य हिंदू मेईतेई समुदायाचा अनुसूचित जमाती (एसटी) यादीत समावेश करण्याच्या मागणीबाबत केंद्राकडे शिफारस पाठविण्यास सांगितले होते.
मणिपूरमध्ये मागील आठवड्यात झालेल्या हिंसाचारातील मृतांची संख्या ५४ झाली आहे. राज्यातील हजारो भयग्रस्त नागरिकांनी स्थलांतर केले आहे 23,000 हून अधिक विस्थापितांनी सध्या लष्कराच्या छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. याबाबत बोलताना अमित शहा म्हणाले की, "मणिपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे."
हेही वाचा :