Latest

Hina Khan photoshoot : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानचा बाथटबमधील ग्लॅमरस अंदाज

backup backup

अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. हिनाने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही सीरियलमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेत तिने अक्षराची भूमिका साकारली होती, या मालिकेमुळे तिचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. (Hina Khan photoshoot)

यावेळी तिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या स्टाईलमध्ये हॉट लुक देणारे फोटो शेअर केले आहेत, हे सगळे फोटो बाथटबमध्ये बसून काढण्यात आले आहेत. (Hina Khan)

यासोबत हिना अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करताना दिसते.

Hina Khan photoshoot : चाहत्यांनी मात्र तीच्या फोटोंवर पाडला गुळ

हिनाने बाथटबमध्ये फोटोशुट केले आहे. तीने चाहत्यांना नवीन फोटो दिल्याने तिच्या फोटोंवर चाहत्यांनी चांगलाच गुळ पाडला आहे.

हिनाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

हिना खानने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तीने 'Hello Beautifull' असे कॅप्शन लिहिले आहे. दरम्यान चाहत्यांनीही तीच्या फोटोंवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.

तु नेहमीच  सुंदर दिसतेस

एका चाहत्याने 'तू नेहमीच सुंदर दिसते' असे लिहिले आहे. तर दुसऱ्याने 'बाथटबमध्ये सुंदर राजकुमारी सिंड्रेला' असे लिहिले.

हिना खानने टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती अनेक मोठ्या मालिकांमध्ये दिसली.

याबरोबर हिना खान सिद्धार्थ शुक्ला आणि गौहर खानसोबत बिग बॉस १४ मध्ये सीनियरच्या भुमिकेत दिसली आहे. काही दिवसांपूर्वी तीचे 'बारिश बन जाना' हे गाणे रिलीज झाले आहे.

यानंतर तीचे आणखी एक नवीन गाणे 'मैं भी बर्बाद', हे गाण्यालाही खूप पसंती दिली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT