पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी कलाविश्वातील अभिनेत्री हेमांगी कवी नेहमी चर्चेत असते. तिने नुकतचं आपला एक फोटो इन्टाग्रामवर शेअर करत एक सुंदर पोस्ट लिहली आहे. यामूळे पुन्हा ती चर्चेत आली आहे. 'आजीचा ऐवज'… (Hemangi Kavi'S Zero Budget Look) अशी सुंदर कॅप्शन तिने दिली आहे.
'आजीचा ऐवज'
आपल्या बिनधास्त आणि परखड बोलण्याने हेमांगी नेहमीच चर्चेत असते. हेमांगीने गुलाबी साडी आणि प्लेन ब्लॅक लॉंग स्लिव्जचा साधा टॉप त्यावर साजेशी अशी ऑक्साईड ज्वेलरी घातलेला सुंदर फोटो आहे. इन्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचबरोबर तिने 'आजीचा ऐवज' अशी कॅप्शन देत तिने छान पोस्ट लिहली आहे.
झिरो बजेट स्टायलिंग (Hemangi Kavi'S Zero Budget Look)
तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मला माझ्या कपड्यांचं स्टायलिंग करायला आवडतं. साधं सोप्पं आणि आपल्या बजेट मधलं. आणि हा लूक तर झिरो बजेट आहे. कारण ही
#chiffon ची साडी मी जश्न मधून २०११ साली घेतली होती. २०११ ही किंमत नाही आहे तर साल आहे. ९ वर्ष जुनी साडी आहे ही. सेल चालू होता, स्वस्तात मिळाली म्हणून घेतली होती साडी. आणि हा ब्लाउज नसून प्लेन ब्लॅक लॉंग स्लिव्जचा साधा टॉप आहेत. जो मी ब्लॅक पेन्सिल स्कर्ट मध्ये घालते. गेले कित्येक वर्षांत मी ब्लाउज शिवला नाही आहे. जे आहेत तेच वापरते किंवा अश्या वेस्टर्न टॉपचा उपयोग करते. मला मिसमॅच्ड लूक खूप आवडतात. त्यात एक वेगळीच ऊर्जा असते!
मला ऑक्साईड ज्वेलरीची भयंकर आवड आहे, असे गळ्यातले ढीगभर जमा केलेत इतक्या वर्षात. अनेक वर्षांच्या प्रॅक्टीसने आणि चित्रकार असल्यामुळे मेकअप, हेअर वगैरे आता बऱ्यापैकी छान जमतं!
आजीचा चांदीचा कंबरपट्टा
या लूकमधली सर्वात महागडी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे माझ्या आजीचा (आईची आई) चांदीचा कंबरपट्टा! माझी आजी नऊवारी वर लावायची हा पट्टा. शंभर एक वर्ष तर आरामात झाली असतील याला. कमळाच्या फुलांचं बारीक, नाजूक नक्षीकाम केलेलं आहे. त्यावर Adjustment साठी साखळ्या आहेत. माझी आजी सर्वात पहिल्या साखळीत हुक अडकवायची. इतकी बारीक कंबर होती तिची. आजीने मला हा अमूल्य ठेवा देऊन गेली आहे.
कंबरपट्टा जपून ठेवा
'आजीचा ऐवज' च्या भावूक पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरुन कॉमेंट्स केल्या आहेत. कमाल लूक गं, आणि लिहलं पण छान आहेस गं, पाहून अजिबात वाटत नाहीय की हा लुक झिरो बजेट मध्ये बसला असेल. कंबरपट्टा तर खूपच सुंदर, खूप सुंदर दिसताय तुम्ही❤️, मला पण ऑक्साईड ज्वेलरी भयंकर आवडतात, खऱ्या सौंदर्याला शृंगाराची गरज नसते, हेमांगी तुम्ही खूप सुंदर दिसता साडीत, डोळ्यात एक मोहकता दिसते, ?कंबरपट्टा जपून ठेवा, आजीची आठवण, स्टाईल क्वीन ऑफ महाराष्ट्र, हे लय भारी, नादबाद दिसतंय मॅडम,
मुळातंच सुंदर असलेल्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा पोशाख परिधान केला, तरी तो चांगलाच दिसतो, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे, अगं माझी गुणाची बाय अशा भन्नाट कॉमेंट्स आल्या आहेत.
हेमांगीचा हा लूक आणि पोस्ट तिच्या चाहत्यांना भावली आहे. याअगोदरही ती बाई, बुब्स आणि ब्रा ही पोस्ट, काकू म्हंटल्यावर न चिडण्याचं वय झालं आहे आता.. असं विधान केलं होतं तेव्हाही ती चर्चेत आली होती. हेमांगीने आपल्या अभिनयाने प्रेक्षंकावर छाप पाडली आहे.
हेही वाचलं का?
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.