मुंबई ; पुढारी ऑनलाईन : hemangi kavi या अभिनेत्रीने बाई बुब्स आणि ब्रा या विषयावर फेसबुक पोस्ट शेअर केलीय. hemangi kavi ने केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांसह सिनेसृष्टीतल्या सेलेब्रिटींनी तीला पाठींबा दर्शवला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी हेमांगीने एक व्हिडीओ शेअर केला होता. यावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर हेमांगीने फेसबुकवर पोस्ट करत नेटकऱ्यांना चांगलच सुनावल होतं.
महिलांना नेहमी त्यांच्या कपड्यावरून सूचना केल्या जातात. यावरून हेमांगीही ट्रोल झाली होती. त्यानंतर हेमांगीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत स्त्रीयांच्या कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर वाचा फोडली आहे.
अधिक वाचा :
इन्स्टाग्रामवरही हेमांगीने नेटकऱ्यांना प्रत्त्यूत्तर दिले होते. स्त्रीयांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षावर हेमांगीने परखडपणे लिहले होते. हेमांगीच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी तिला पाठिंबा दिला आहे.
अभिनेत्यांचा हेमांगीला पाठींबा
हेमांगीच्या पोस्टवर अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी आपल्या शैलीत तीचे कौतुक केले आहे.
विचार म्हणुन खतरनाक ऽऽऽऽ..खन म्हणून वरचा दर्जा…साहित्य म्हणून कालातीत ..तू लढ हेमांगी."असं म्हणत प्रविण तरडेंनी तिला प्रोत्साहनात्मक पाठिंबा दिला आहे.
तर अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शका रसिका आगाशेने देखील लव्ह यू मुली, ब्रालेस असण्याचा आनंद आहे." असे म्हणत पाठींबा दिला आहे.
अधिक वाचा :
तर हेमांगीच्या या पोस्टवर कमेंट करत अभिनेत्री वीणा जामकरनेदेखील हेमांगीला पाठिंबा दिलाय. "क्या बात हेमांगी..सॉलिड , लय भारी … वाचून सुद्धा हायसं वाटलं गं …" असं वीणा म्हणालीय.
बाईला समाजात वावरताना येणाऱ्या बंधनाविषयी बोलणाऱ्या हेमांगीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
अधिक वाचा :
कलाकारांसोबतच अनेक चाहत्यांनी हेमांगीचे कौतुक करत मांडलेल्या भूमिकेला सहमती दिली आहे.
हेमांगी अनेक विषयांवर परखड पणे मते मांडत आली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी हेमांगीने सारेगम लिट्ल चॅम्पस् या कार्यक्रमातील पंचरत्नांवर होणाऱ्या टीकेवर परखड मत मांडले होते.
[visual_portfolio id="6394"]
हे ही वाचा :